Premium|Satara Literary Heritage : साहित्य, कला अन् संस्कृती

Marathi Literature and Culture : सातारा जिल्ह्याच्या मध्ययुगीन ते अर्वाचीन काळातील समृद्ध साहित्य, कला, शाहिरी आणि नाट्य परंपरेचा ऐतिहासिक प्रवास; ज्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गदिमा आणि बा.सी. मर्ढेकरांसारख्या दिग्गजांनी जागतिक पटलावर उमटवलेल्या सांस्कृतिक मुद्रांचा सखोल आढावा घेतला आहे.
Marathi Literature and Culture

Marathi Literature and Culture

esakal

Updated on

निलेश महिगावकर

कला अन् साहित्य क्षेत्रातले सातारचे योगदान या विषयाला जितका जास्त स्पर्श करत जाऊ, तितका या विषयाचा अवकाश विस्तारत जातो. एकूणच कला आणि साहित्याच्या क्षितिजावर गेली कित्येक वर्षे सातारा अनेक आघाड्यांवर तळपत आहे आणि तळपत राहील यात तीळमात्र शंका नाही. सातारच्या योगदानाचा हा धावता आलेख.

सातारच्या साहित्यिक जडणघडणीत मध्ययुगीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत अनेक साहित्यिकांनी आपले अफाट योगदान दिले आहे. सातारच्या साहित्य परंपरेचा धांडोळा घेतला असता आश्चर्यकारक तपशील हाताला लागतो. साहित्य आणि एकूणच सांस्कृतिक क्षेत्रातील सातारकरांचे योगदान पाहिले तर थक्क व्हायला होते. हा समृद्ध वारसा काळाच्या उदरात विस्मरणात जाण्याची शक्यता असते. आपले पूर्वसूरी कोण आणि त्यांचे योगदान काय हे कळल्याशिवाय आपण प्रगतीच्या कुठल्या टप्प्यावर उभे आहोत हे कळणे कठीण असते. अनेकदा आपल्याला मिळालेला वारसा हा कधीकाळी त्याग आणि संघर्षाच्या तळपत्या इतिहासावर उभा असतो. त्यासाठी अनेकांनी किंमत चुकवलेली असते. भविष्याचे दिशादर्शन होण्यासाठीही हा इतिहास समजून घेणे गरजेचे असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com