सीए डॉ. दिलीप सातभाई
बचत किती असावी याचे एका वाक्यात उत्तर द्यायचे झाले, तर तुमची जीवनशैली ज्यावेळी तुमच्या मते सर्वात उत्तम होती, त्यावेळी होत असलेला खर्च जर पुढील आयुष्यात करायचा असेल, तर महागाईमुळे पैशाची कमी होणारी क्रयशक्ती विचारात घेऊन ठरविलेली रक्कम...
सर्वसामान्य माणसास अजूनही बचत म्हणजे काय हे समजावून सांगावे लागते, कारण बऱ्याचजणांच्या मते बचत म्हणजे महिन्याच्या अखेरीस उत्पन्नातून खर्च वजा जाता राहिलेली रक्कम, जी भविष्यातल्या खर्चासाठी गुंतवून त्यावर व्याज मिळवता येते. तथापि, ‘बचत’ या शब्दात एवढेच अभिप्रेत नाही.