पटकथेची गुंफण

चित्रपटात सहसा छोटे प्रसंग लिहिले जातात परंतु पटकथा लेखकाने बंदिस्त खोलीत घडणारा एक एकोणीस मिनिटांचा प्रसंग विस्ताराने लिहिला.
screenplay
screenplaySakal

चित्रपटाच्या कथेची मांडणी करताना सुरुवातीपासून प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणे हे पटकथा लेखकाचे कौशल्य असते. उत्तम सिनेमाची बांधणी करताना पटकथा लेखक उत्तम सुरुवात, मध्यंतर आणि लक्षात राहणारा शेवट अशा पद्धतीने करताना इतरही अनेक बाबींचा विचार करतात.

‘इनग्लोरियस बास्टर्ड्‌स’ चित्रपटाच्या सुरुवातीला पात्रांची ओळख करून देणारा प्रसंग लिहिताना क्वेन्टीन टेरंटीनो यांनी उत्तम पटकथेचा वस्तुपाठच घालून दिला आहे. पेरीयरच्या घरी आलेला कर्नल हँस लँडा अत्यंत थंड डोक्याने एकेक प्रश्न विचारून घरात लपलेले ज्यू शोधून काढतो, हा प्रसंग पटकथा लेखनाचे कौशल्य दाखवतो.

चित्रपटात सहसा छोटे प्रसंग लिहिले जातात परंतु पटकथा लेखकाने बंदिस्त खोलीत घडणारा एक एकोणीस मिनिटांचा प्रसंग विस्ताराने लिहिला. चित्रपट ही अनेक प्रसंगांची मालिका (Sequences) असते. सिक्वेन्स – दृश्यक्रम -अनेक दृश्यांनी (Scenes) बनलेले असतात. एका दृश्यामध्ये अनेक शॉट्स असतात. ‘इनग्लोरियस बास्टर्ड्‌स’ या अडीच तासांच्या चित्रपटात फक्त पाच दृश्यक्रम लिहिले आहेत, त्यातील एक सिक्वेन्स सर्वात मोठा म्हणजे तीस मिनिटांचा आहे. प्रयोगशील लेखक-दिग्दर्शक क्वेन्टीन टेरंटीनो यांचे हे धाडस कौतुकास्पद आहे.

screenplay
Mumbai Fraud : गुप्तहेर संस्थेचा अधिकारी असल्याचे सांगून करोडोची फसवणूक; तोतया अधिकारी अटकेत

चित्रपटाच्या कथेची मांडणी करताना सुरुवातीपासून प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणे हे पटकथा लेखकाचे कौशल्य असते. उत्तम सिनेमाची बांधणी करताना पटकथा लेखक उत्तम सुरुवात, मध्यंतर आणि लक्षात राहणारा शेवट अशा पद्धतीने करताना, त्यामध्ये पात्रांमधील तणावपूर्ण संबंध, संघर्ष आणि समेट घडवण्यासाठी केलेले प्रयत्न, अपेक्षित/ अनपेक्षित उपाययोजना अशा अनेक बाबींचा विचार करतात.

अनेक चित्रपटाच्या सुरुवातीलाच चित्रपटाचा नायक/ नायिका एका संकटात सापडते. (होम अलोन, एक हसीना थी, डबल जिओपार्डी, बदलापूर, कास्ट अवे). चित्रपट पुढे सरकतो तसतसे नायक/ नायिका त्यामध्ये अधिक गुंतत जातात, प्रेक्षकांना नकोसे वाटणारे उपद्व्याप करतात (जॉज), बुद्धिबळातील काही खेळी उत्तम असतात तर काही चाली चुकीच्या असतात

(बदलापूर, द फ्युजिटीव्ह) आणि चित्रपटाच्या शेवटी नायक/ नायिका अत्यंत चतुराईने त्या संकटांच्या मालिकांमधून मधून सुटका करून घेतात त्यावेळी प्रेक्षक सुटकेचा निःश्वास टाकतात (दृश्यम, कहानी, एनएच १०, डाय हार्ड). परंतु कठीण परिस्थितीतून मार्ग काढताना नायक-नायिका किंवा प्रेक्षकांशी परिचय असलेल्या पात्राने प्रश्न न सोडवता चित्रपटात आतापर्यंत न दिसलेल्या व्यक्तीने / अनामिक शक्तीने मदत केल्यास प्रेक्षकांचा भ्रमनिरास होतो.

screenplay
Mumbai News : कल्याण डोंबिवली शहरातील खड्डयांनी घेतला बळी; अभियंता अहिरे यांच्यावर कारवाई करा, मनसेची मागणी

अनेक चित्रपटांच्या पटकथेमध्ये एकच प्रश्न सोडवणारी एकच कथा वेगळ्या तंत्राने सांगितलेली असते तर काही चित्रपटांमध्ये एकापेक्षा अधिक कथा असतात. ‘ट्वेल्व्ह अँग्री मेन’सारख्या चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि प्रेक्षक एका प्रश्नाचे एकेक धागेदोरे उलगडून सोडवण्यात मश्गूल होतात. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या त्या युवकाने खून केला आहे,

असे ठाम मत असणाऱ्या दहा ज्युरी सदस्यांना एक ज्युरी विरोध करतो आणि म्हणतो, की आपली नेमणूक त्या प्रश्नावर सखोल चर्चा करण्यासाठी झाली आहे आणि एका व्यक्तीच्या जीवन-मरणाचा प्रश्न आपण पाच मिनिटात सोडवू शकत नाही. हा चित्रपट प्रश्न विचारण्याची गरज अधोरेखित करतो. चिकित्सक वृत्तीने अभ्यास केल्यावर असे लक्षात येते, की खुनासाठी वापरलेला चाकू दुर्मीळ नाही,

त्या वृद्ध स्त्रीला चष्म्याशिवाय दिसत नाही त्यामुळे तिची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही. चर्चेमध्ये मांडलेले मुद्दे आणि त्या मुद्द्यांना केलेल्या विरोधामधून प्रेक्षकांना बारा ज्युरींची स्वभाव वैशिष्ट्ये समजू लागतात हे रेगिनाल्ड रोस यांच्या पटकथा लेखनाचे वैशिष्ट्य आहे. ‘ट्वेल्व्ह अँग्री मेन’ चित्रपट संपतो त्यावेळी युवकाने खून केला आहे की नाही हा प्रश्न बारा ज्युरींनी मिळून मुद्देसूद वादविवाद करून सोडवलेला असतो.

एकापेक्षा अधिक कथा एकाच चित्रपटात सांगितलेल्या असतात का? अर्थातच असतात. दोन वेगवेगळ्या कथा एकमेकात गुंफल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘गॉडफादर-२’ ज्यामध्ये व्हिटो कॉर्लीऑन (रॉबर्ट डी-नीरो) आणि मायकेल कॉर्लीऑन (अल पचिनो) यांच्या वेगवेगळ्या कथा समांतर पद्धतीने समजून घेता घेता प्रेक्षक खुर्चीला खिळून बसतात. ‘फाइंडिंग निमो’ चित्रपटाची पटकथा निमो आणि निमोला शोधणारा मर्लिन अशा दोघांच्या दृष्टिकोनातून लिहिली आहे. ‘द डिपार्टेड’ (२००६) चित्रपटाची पटकथाही दोघांची आहे.

बिली (लिओनार्डो डिकॅप्रिओ) हा पोलिस अधिकारी फ्रँकच्या (जॅक निकोल्सन) गँगचा छडा लावण्यासाठी त्या गँगमध्ये सामील होतो. त्याचवेळी कोलिन (मॅट डेमॉन) हा फ्रँकच्या गँगमधला गुन्हेगार पोलिसांच्या पथकात शिरकाव करतो. बिली आणि कोलिन दोघेही खबरे असल्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात ते दोन भूमिका करतात.

एका क्षणी गँग आणि पोलिस दोघांनाही खात्री वाटते की आपल्यामध्ये एक खबऱ्या आहे. ‘इंटर्नल अफेअर्स’ (२००२) या हाँगकाँगच्या चित्रपटाचा रिमेक करताना विल्यम मोनहन यांनी पटकथा लिहिली आणि मार्टिन स्कॉर्सेसी यांनी दिग्दर्शन केलेला ‘द डिपार्टेड’ पुनःपुन्हा बघावा लागतो, पण ‘इंटर्नल अफेअर्स’ बघितल्यानंतर मूळ चित्रपट अधिक दर्जेदार असल्याची प्रचिती येते.

‘युवा’ चित्रपटामध्ये तिघांच्या कथा एकमेकात गुंतलेल्या आहेत. लल्लन (अभिषेक बच्चन) गुंड आहे. त्याने युवा नेता मायकेलला (अजय देवगण) मारण्याची सुपारी घेतलेली आहे. हा गोळीबार हावडा ब्रिजवर होत असताना अमेरिकेचे आकर्षण असलेला अर्जुन (विवेक ओबेरॉय) त्याच ब्रिजवर त्याच्या प्रेयसीला लग्नाची मागणी घालतो आहे.

खुनाचा प्रयत्न समोर बघितल्यानंतर अर्जुन मायकेलला वाचवण्याचा प्रयत्न करतो. एकाच शहरात राहणारे ते तिघेही वेगवेगळ्या विश्वातील आहेत; परंतु त्यांच्या कथा एकमेकात गुंफल्या जाणार आहेत, हेच ‘युवा’चे वैशिष्ट्य आहे. अशी गुंतागुंतीची पटकथा विणण्याची कुशल कारागिरी अनुराग कश्यप आणि मणिरत्नम यांनी केली आहे.

‘बॅबल’ चित्रपटात तीन खंडातल्या चार देशातील चार कुटुंबांच्या चार कथा आहेत. ही विविध पात्रे सहा वेगवेगळ्या भाषा बोलत असली तरीही एका घटनेने ती सगळी कुठेतरी एकमेकांशी जोडली जातात. मोरोक्कोच्या दुर्गम भागामध्ये दोन मुलांना एक लांब पल्ल्याची रायफल मिळते. दूरवरून येणाऱ्या बसवर नेम धरून रायफलचा चाप ओढल्यावर सुटलेली गोळी टूरिस्ट बसमध्ये खिडकीच्या बाजूने बसलेल्या सुसान (केट ब्लँचेट) या अमेरिकी महिलेला लागते आणि ती गंभीर जखमी होते.

बस तिथेच थांबवून तिचा नवरा रिचर्ड (ब्रॅड पिट) स्थानिकांच्या मदतीने घरगुती उपचार करण्याचा प्रयत्न करतो आणि घरी फोन करतो. तिकडे दक्षिण अमेरिकेत आमेलिया ही महिला रिचर्डच्या दोन मुलांचा सांभाळ करत असते. या अपघातामुळे आमेलियाचे सुट्टीचे नियोजन कोलमडते तरीही ती दोन मुलांना बरोबर घेऊन मेक्सिकोमध्ये समारंभाला हजेरी लावण्यासाठी जाण्याची चूक करते आणि अमेरिकेत परत येताना पोलिस तिला अडवतात. मोरोक्कोमध्ये ज्या रायफलमधून ही गोळी सुटलेली असते, ती रायफल टोकियोमधील एका प्रवाशाने गाइडला सप्रेम भेट म्हणून दिलेली असते.

screenplay
Mumbai News : कल्याण डोंबिवली शहरातील खड्डयांनी घेतला बळी; अभियंता अहिरे यांच्यावर कारवाई करा, मनसेची मागणी

तो गाइड ती रायफल मोरोक्कोमधील एका रहिवाशाला एक मेंढी आणि ५०० मोरक्कन दिरहामच्या बदल्यात देतो. चुकीच्या पद्धतीने दिलेली सप्रेम भेट चार देशातील चार कुटुंबीय आणि आसपासची परिस्थिती कशी बिघडवते हे ग्युईलेर्मो अरीयागा यांनी अतिशय कुशलतेने पटकथेमध्ये मांडले आहे.

एकमेकांशी संवाद साधण्यामध्ये भाषेमुळे अडथळा येतो का? चार वेगवेगळ्या संस्कृतीमधील मुलांच्या संगोपनाच्या संकल्पना कशा वेगळ्या आहेत? त्यामधून कसे मार्ग काढले जातात? असे पटकथेमधील बारकावे समजून त्याचे वेगवेगळे अर्थ लावण्यासाठी हा चित्रपट अनेकवेळा बघावा असाच आहे. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘मसान’, ‘पल्प फिक्शन’सारख्या चित्रपटांतही दोनपेक्षा अधिक कथा एकमेकात गुंतलेल्या आहेत.

screenplay
Mumbai News : कल्याण डोंबिवली शहरातील खड्डयांनी घेतला बळी; अभियंता अहिरे यांच्यावर कारवाई करा, मनसेची मागणी

कथा एका नायकाची असो वा अनेक नायक/ नायिकांची, कथा सांगण्याचे प्रकार किती आहेत? ‘एक होता राजा...’ या पद्धतीने एका क्रमाने सांगणे आणि दुसरा प्रकार म्हणजे अधिक गुंता करून सांगणे. ‘फॉरेस्ट गम्प’सारख्या चित्रपटात नायकच आपल्या आयुष्याची कथा प्रेक्षकांना (किंवा चित्रपटातील एखाद्या पात्राला) एका क्रमाने (Linear) सांगत असतो.

‘मेमेंटो’ सारख्या चित्रपटात ख्रिस्तोफर नोलानसारखे पटकथा लेखक-दिग्दर्शक कथेचा शेवट पहिल्या भागात सांगतात आणि पूर्ण कथा सलगपणे न सांगता उलट-सुलट (Non-Linear) किंवा अनोख्या क्रमाने दाखवतात.

‘पल्प फिक्शन’, ‘इटर्नल सनशाईन ऑफ स्पॉटलेस माईंड’, ‘बॅबेल’, ‘युवा’, ‘ल्युडो’, ‘३- इडियट्‌स’ या चित्रपटांच्या पटकथा अशा पद्धतीने लिहिलेल्या आहेत. हे चित्रपट बघताना प्रेक्षकाने अधिक सजग राहणे अपेक्षित असते. कथा सांगण्यासाठी पटकथा लिहिण्याचा कोणता फॉरमॅट / प्रकार निवडावा, हा निर्णय पटकथा लेखकाचा असतो.

screenplay
Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेत बनावट ओळखपत्रांचा सुळसुळाट

कथा सांगण्याची आणखी एक अनवट पद्धत आहे. एखादी घटना घडल्यानंतर त्याकडे वेगवेगळ्या लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. खोटे बोलणे हा मानवी स्वभाव आहे, बऱ्याच वेळेस ‘आपुलाची संवाद आपणाशी’ करतानासुद्धा आपण प्रामाणिक नसतो. याच संकल्पनेमधून जन्म झाला एकाच घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघून सत्य काय आहे याचा शोध घेणारी पटकथा लिहिण्याचा.

मानवी स्वभावावर विचार करण्यास प्रवृत्त करणारी पटकथा अकिरा कुरोसावा यांनी ‘राशोमान’ चित्रपटामध्ये पहिल्यांदा लिहिली आणि अनोख्या पद्धतीने सादर केली आणि अशा वेगळ्या हाताळणीला राशोमान-पद्धत असे नाव पडले. एक लाकुडतोड्या जंगलात फिरत असताना त्याने एका सामुरायचे प्रेत बघितल्याचे तो सांगतो.

त्यामुळे त्याच्या म्हणण्यानुसार त्या सामुरायचा खून झालेला आहे. त्या सामुरायची टोपी, सामुरायच्या पत्नीची हॅट, एक दोरखंड आणि एक ताईत (ताबीज) लाकुडतोड्याने बघितला आणि त्यानंतर त्याने त्याचा तपास करणाऱ्या लोकांकडे त्याबद्दल तक्रार केल्याचे त्याचे म्हणणे आहे. एक अत्यंत खोडसाळ लुटारू सांगतो की त्याने सामुरायला त्याच्या पत्नीला घोड्यावर बसवून जंगलातून प्रवास करत असताना बघितले आणि एक तलवार विकत घेण्याचा प्रस्ताव त्या सामुरायसमोर ठेवला.

लुटारूने सामुरायला झाडाला बांधून त्याच्या पत्नीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यावर तिने त्या दोघा पुरुषांना एकमेकात लढण्याची कल्पना सुचवली. विजेत्याबरोबर ती राहील, असे तिने त्यांना सांगितले. लुटारू जिंकला परंतु तोपर्यंत सामुरायची पत्नी पळून गेलेली आहे. याउलट सामुरायच्या पत्नीने सांगितलेली कथा वेगळीच आहे. लुटारूने हल्ला केल्यावर तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे लुटारू पळून गेला.

त्यानंतर तिने नवऱ्याची सुटका करून त्याची माफी मागितली परंतु अनेक विनवण्या करूनही नवऱ्याने माफ केले नाही, त्या धक्क्याच्या परिणामस्वरूप बेशुद्ध पडल्यामुळे नवऱ्याचा खून कोणी केला याबद्दल तिला काही माहिती नसल्याचे तिचे म्हणणे आहे. लाकुडतोड्या खुनाची कथा वेगळ्याच पद्धतीने सांगतो.

screenplay
Mumbai News : कल्याण डोंबिवली शहरातील खड्डयांनी घेतला बळी; अभियंता अहिरे यांच्यावर कारवाई करा, मनसेची मागणी

मृत सामुराय एका स्त्रीच्या माध्यमातून स्वतःच आत्महत्या केल्याची कथा सांगतो. चित्रपटामध्ये आपल्याला जे दृश्य दिसते ते प्रत्येक व्यक्तीने वर्णन केलेले व्हर्जन आहे. प्रत्येकजण कथा सांगताना त्यामध्ये कुठेतरी आत्मप्रौढी, स्वार्थ, अपराधीपणा लपल्याचे दिसते परंतु नेमके खरे काय घडले याबद्दल पटकथा लेखक – दिग्दर्शक अकिरा कुरोसावा काहीच भाष्य करत नाही. ऐकीव कथेमधील नेमके सत्य काय असते, हाच प्रश्न राशोमान चित्रपटाद्वारे विचारला गेला.

म्हणूनच आजही तो चित्रपट किती दूरदर्शीपणे लिहिला गेला याचे कौतुक वाटत राहते. ‘तलवार’, ‘रन लोला रन’, ‘लूप लपेटा’, ‘लाइफ ऑफ पाय’, ‘व्हॅन्टेज पॉइंट’ अशा चित्रपटांच्या पटकथा या पद्धतीने लिहिल्या आहेत.

screenplay
Mumbai : मुंबईला जोरदार पावसाने झोडपले; रेल्वे वाहतुक कोलमडली, प्रवाशांचे हाल

यामधील नेमके सत्य काय आहे, कोणता पर्याय बरोबर आहे, नायक कोण- खलनायक कोण यासंबंधी प्रत्येक प्रेक्षकाने आपापल्या विचार प्रक्रियेप्रमाणे निर्णय घ्यावा अशी पटकथा लेखक आणि दिग्दर्शकाची अपेक्षा असते.

कारण बघितलेली घटना सांगताना अनेकजण आपापल्या मतानुसार पक्षपात करतात, घटना आठवताना सरमिसळ होते आणि कोणत्याही दोन व्यक्ती एकच घटना वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. सत्याचा शोध प्रत्येकाला घ्यायला आवडते पण सत्य स्वीकारण्याची प्रत्येकाची तयारी असते का?

कोणत्याही पद्धतीने पटकथेची रचना केलेली असली तरी ती कथा रचताना चित्रपटात वेळेचे गणितही मांडावे लागते, ते कसे मांडले जाते, याबद्दल पुढील लेखात...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com