

Everest Base CampTrek
esakal
रवींद्र ताबेकर
सुरुवातीचे काही दिवस अतिशय सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात गेले. एका बाजूला प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नद्या, तर दुसऱ्या बाजूला बर्फाच्छादित शिखरे होती. बाराशे फुटांपर्यंत पाईन वृक्षांची जंगले दिसत होती. पण जसजसे वर जात होतो, तसतशी झाडांची उंची कमी कमी होत होती. केवळ गवत, दगड आणि बर्फ यांच्या तीन रंगांनी सृष्टी सजलेली दिसत होती.