Premium|Sensitive Skin: पिंपल्स, डार्क स्पॉट्स आणि स्किन सेन्सिटिव्हिटी

Hormonal changes on skin: हार्मोनल बदलांमुळे येणारे त्वचेवरील डाग कसे घालवावेत?
sensitive skin problem
sensitive skin problemEsakal
Updated on

स्वप्ना साने

अमुक क्रीम लावल्यावर त्वचा खाजतेय किंवा रॅश येतेय; किंवा कुठला फेस पॅक लावल्यावर त्वचा सुजलीये, लाल झालीये किंवा कधी वॅक्सिंग वगैरे केल्यावर त्वचेवर पुरळ उठले आहे, असे अनेकदा पाहायला मिळते. आणि मग अशी रिॲक्शन आली की लक्षात येते, की त्या प्रॉडक्टची आपल्याला ॲलर्जी आहे.

त्वचा सेन्सिटिव्ह असल्यास ह्यातील काही लक्षणे दिसून येतात. ॲलर्जी काही विशिष्ट घटकांची असू शकते. त्वचा सेन्सिटिव्ह असल्यास साधे थ्रेडिंग केल्यावरही त्वचा लालबुंद होऊन पुरळ उठते. उन्हात गेल्यावर लगेच त्वचा लालसर होणे किंवा पुरळ येऊन खाजणे किंवा काळवंडणे ह्याला फोटो सेन्सिटिव्ह स्किन म्हणतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com