

Personal growth and self-care tips
esakal
मर्यादा केवळ आपण आखलेल्या मर्यादांपुरत्या सीमित नसतात, तर इतरांनी आखलेल्या मर्यादांना आपण कसा प्रतिसाद देतो यालाही महत्त्व असतं. कुणाकडून तरी ‘नाही’ ऐकणं हे त्रासदायक वाटू शकतं, टोचू शकतं; पण त्या क्षणी हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, की एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून निर्माण झालेल्या दोन वेगवेगळ्या गरजा असू शकतात. अनेकदा समोरच्याकडून येणारा नकार वैयक्तिक नसतो, तर ती त्या व्यक्तीची मर्यादा, त्याची गरज असू शकते.
‘‘हो, मी आजच काम पूर्ण करते.’’
‘‘नक्की! मी तुझ्या पार्टीला येईन.’’
‘‘जरा श्रुतीने काय मेसेज केला ते बघते, कदाचित तिला मदत हवी असेल!’’
ही वाक्यं ओळखीची वाटतायत का?