Premium|Seven Letters Mystery : वडिलांच्या मृत्यूचं गूढ, सात पत्रं आणि घरातच लपलेला शत्रू

Father's Hidden Truth : वडिलांच्या मृत्यूनंतर आर्यनच्या हाती लागते सात पत्रांनी भरलेली रहस्यमय पेटी. प्रत्येक पत्रातून उलगडणारे सत्य, घरातील शत्रू आणि न्यायासाठीचा संघर्ष त्याचे आयुष्य बदलणार का?
Father's Hidden Truth

Father's Hidden Truth

esakal

Updated on: 

नम्रता हरिभाऊ हुंबे, धाराशिव

... त्या रात्री मी बाबांचं सातवं पत्र उघडलं. पत्रात लिहिलं होतं, ‘‘प्रिय आर्यन, हे पत्र तू वाचत आहेस म्हणजे तू सत्यापर्यंत पोहोचलास. लोक तुला सांगतील, की मी हिरो होतो, पण मला हिरो व्हायचं नव्हतं. मला फक्त माझा मुलगा चांगला माणूस व्हावा एवढंच हवं होतं. लक्षात ठेव, सूड माणसाला क्षणभर जिंकवतो, पण न्याय पिढ्यान््पिढ्या जिवंत राहतो. अन्वीला वाचवता नाही आलं, तरी तिचं स्वप्न जिवंत ठेव...’’

पावसाची रात्र होती. घरात मी एकटाच बसलेलो होतो. भिंतीवर बाबांचा फोटो लावलेला होता. त्याला हार चढवून अवघे तीनच दिवस झाले होते. दारावर टकटक झाली. रात्रीचे बारा वाजले होते. दार उघडलं, पण बाहेर कोणीच नव्हतं. दाराजवळ फक्त एक लाकडी पेटी पडली होती. ती उचलून आत आणली. पेटीवर माझं नाव कोरलेलं होतं, ‘‘आर्यन, ही पेटी फक्त तूच उघड.’’ माझ्या छातीत धडधड वाढली. मी कुलूप तोडलं. आत सात पांढरे लिफाफे होते. प्रत्येकावर मोठ्या अक्षरांत लिहिलेलं होतं - पहिलं पत्र, दुसरं पत्र... सातवं पत्र. सर्वात वर आणखी एक चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, ‘‘आर्यन, जर तू ही पेटी उघडली असशील, तर मी या जगात नाही. माझा मृत्यू नैसर्गिक नाही. सत्य जाणून घ्यायचं असेल, तर क्रमानंच पत्र वाच. सगळ्यात शेवटी सातवं पत्र वाच.’’ माझे हात थरथर कापत होते. बाबांचा मृत्यू अपघाती नव्हता? मी घाईघाईनं पहिला लिफाफा उघडला. त्यातल्या पत्रात फक्त एकच वाक्य होतं, ‘‘तुझा सर्वात मोठा शत्रू तुझ्या घरात आहे.’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com