Premium|Pet Rescue: प्राण्यांच्या रेस्क्यूमागील संघर्ष आणि सामाजिक जबाबदारीची कथा

Animal shelter: अजूनही बरेच लोक प्राण्यांकडे त्रासदायक जीव म्हणून पाहतात, प्रेमानं नव्हे..
Pet Rescue
Pet RescueEsakal
Updated on

शरण्या शेट्टी

रेस्क्यू केल्यानंतर प्रत्येक प्राण्याचं भविष्य वेगवेगळं असतं. काही प्राणी पूर्णपणे बरे होऊन त्यांच्या नव्या घरी जातात. काही अपंग प्राणी आयुष्यभर आमच्याच आश्रयात राहतात. काहींचं पुनर्वसन ग्रामीण भागात केलं जातं.

पेट रेस्क्यूची आवश्‍यकता काय आहे हे जाणून घेण्याआधी पेट रेस्क्यू म्हणजे काय हे जाणून घेणं रास्त ठरेल. पेट रेस्क्यू म्हणजे अपघातग्रस्त, आजारी, टाकून दिलेल्या किंवा क्रौर्याचा बळी ठरलेल्या पाळीव प्राण्यांना मदत करणं; त्यांना वैद्यकीय मदत, प्रेम आणि सुरक्षित आश्रय देणं. पेट रेस्क्यू ही केवळ मदत नव्हे, तर एक अत्यावश्यक सामाजिक जबाबदारी झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com