layba patiland shivaji maharaj
Esakal
प्रशांत देशमुख
छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले. अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, त्यांच्यावर ओढावलेले बिकट प्रसंग, त्या प्रसंगांतून निभावून नेण्यासाठी त्यांनी काढलेले मार्ग आणि स्थापन केलेले स्वराज्य या सगळ्याचा विचार केला, तर त्यांचे आख्खे आयुष्यच आपल्याला प्रेरणा देत राहते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहता, त्यात विजयाचे अनेक रोमहर्षक प्रसंग अनेक दिसतात. परंतु मोहीम अयशस्वी झाल्याचा प्रसंग मी शोधत होतो. कारण अशा प्रसंगांत शिवराय आपल्या मावळ्यांसोबत कसे वागायचे याचा शोध मला घ्यायचा होता. असा एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात सापडतो.