फूडपॉइंट - आरती अविनाश पालवणकर
भाजणीचे वडे
वाढप
४ ते ५ वडे
साहित्य
प्रत्येकी १ वाटी ज्वारी-बाजरी-हिरवे मूग-तांदूळ, प्रत्येकी अर्धी वाटी उडीद-चणा-मूग डाळ, १ टेबलस्पून धणे, १ टेबलस्पून जिरे, १० मिरे, तिखट चवीनुसार, मीठ चवीनुसार, तीळ, ओवा, तेल.
कृती
सर्व धान्ये वेगवेगळी भाजून घ्यावीत. धणे, जिरेही वेगळे भाजून घ्यावे. सर्व भाजलेले साहित्य एकत्र करून जाडसर दळून भाजणी तयार करून घ्यावी. हवी असल्यास ही भाजणी विकतचीही वापरता येते. नंतर एक वाटी भाजणीत तिखट, मीठ, ओवा व तीळ घालावे. त्यात मोहनासाठी दोन टीस्पून कडकडीत गरम तेल घालावे. नंतर कोमट पाण्याने पीठ भिजवून थोडा वेळ झाकून ठेवावे. सुमारे दहा मिनिटांनी पीठ मळून छोटे वडे करावेत. हे वडे मध्यम आचेवर तळून घ्यावेत. गरमागरम कुरकुरीत वडे तयार.