Premium|Shravan Month : ‘श्रवणीय’ श्रावण; निसर्गनाद, भक्तिगीतं आणि सणांच्या स्वरांनी भरलेला आठवणींचा महिना

Shravan month special : श्रावणातील निसर्गाचे स्वर, भक्तिगीते आणि सणांची साद मनाला स्पर्शून जाते. त्याचबरोबर आजोबांच्या कथांमधून नव्या पिढीला संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्त्वही समजते.
Shravan Month

Shravan Month

esakal

Updated on

स्नेहल बाकरे

श्रावणात ऐकू येणारा प्रत्येक स्वर आपल्याला काहीतरी सांगत असतो... काही आठवणींना उजाळा देत असतो. निसर्गाच्या सळसळाटीपासून ते भक्तिगीतांच्या गजरापर्यंत प्रत्येक आवाज मनाला स्पर्शून जातो. या महिन्यात घुमणारा प्रत्येक नाद, मंत्र, गर्जना, गाणी, आरत्या आणि सणांची साद हे सगळं मिळून श्रावणाला खरोखरच ‘श्रवणीय’ करतं.

घड्याळात रात्रीचे साडेआठ वाजलेले पाहून लगेचच माझ्या मोठ्या मुलीने माझ्या बाबांना स्मार्टफोनवरून व्हिडिओ कॉल लावला. ही वेळ म्हणजे त्यांचा स्पेशल स्टोरी टाइम! यावर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजोळी होतो, तेव्हा माझ्या बाबांनी मुलींना आपल्या हिंदू संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून रोज एक पौराणिक कथा सांगितली. हळूहळू रामायण, महाभारत तसंच आपल्या ऋषिमुनींच्या गोष्टींची मुलींना गोडी लागली. आपल्या प्रत्येक सणामागे त्याचं महत्त्व पटवून देणारी, ते का व कसे साजरे करावेत याची एक कथा दडलेली आहे, याचं त्यांना फारच आश्चर्य वाटलं. उन्हाळ्याची सुट्टी संपली, तरीही रोज रात्री आमच्याकडे हा कथाकथनाचा कार्यक्रम मात्र अखंड सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com