
अश्विनी विद्या विनय भालेराव
श्रावणाचे आगमन म्हणजे निसर्गाच्या नवसर्जनतेची चाहूल, मांगल्याने भारलेल्या सणांसह संस्कृतीशी जोडली जाण्याची संधी, निसर्गाशी नवे नाते जोडण्याचा प्रयत्न! प्रत्येक थेंबात चैतन्य, प्रत्येक फुलात सुगंध आणि प्रत्येक सणात आनंद घेऊन येणारा हा महिना खऱ्या अर्थाने निसर्गाने घालून दिलेली लालित्याची रुंजी आहे. भक्तीचा अनुपम संगम आहे. श्रावण केवळ एक महिना नसून एक भावना आहे, एक अनुभव आहे.