
डॉ. राधिका टिपरे
केरळमधल्या सायलेंट व्हॅली या जंगलाला भेट देण्याची मनापासून इच्छा होती. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणानं माझा तो बेत रद्दच होत होता. यावेळी मात्र सगळं मनासारखं जमून आलं. कोइम्बतूरला जाणाऱ्या विमानाची तिकिटंसुद्धा काढून ठेवली. कोइम्बतूरपासून आमचं मुक्कामाचं ठिकाण केवळ दोन तासाच्या अंतरावर होतं.