नोकरदार वर्गाला एसआयपी करणे सोपे जाते, कारण महिन्याला त्यांच्या बँक खात्यात ठरावीक रक्कम नक्की जमा होत असते. व्यवसाय करणाऱ्यांचेही उत्पन्न निश्चित नसते. ज्यांचे उत्पन्न निश्चित नसते अशा लोकांनी खरेतर एसटीपीचा फायदा घ्यायला हवा, परंतु आजही अनेकांना ही संकल्पनाच माहिती नाही.
मनोज : होय सर, मला म्युच्युअल फंड, एसआयपी किंवा बँक आरडी यांचे महत्त्व माहिती आहे. त्यांचा चक्रवाढ (कंपाउंडिंग) व्याजदराचा फायदासुद्धा माहिती आहे. पण सर, माझा व्यवसाय कपडे शिवण्याचा आहे आणि मी म्युच्युअल फंड एसआयपी किंवा बँक आरडी नाही करू शकत. कारण मला पुढील महिन्यात किती पैसे मिळतील आणि किती बचत होईल हे मला आत्ता माहिती नाही. जर वर्षभरात पाच ते सहा वेळा माझ्या बँक खात्यामध्ये पैसे नसतील, तर एसआयपी करून काय उपयोग होईल?