Premium|Gardens by the Bay Singapore : युद्धाच्या सावटानंतर साकारली सिंगापूर-मलेशिया सफर; फ्लॉवर डोमने जिंकले मन

Flower Dome Singapore : युद्धाच्या अनिश्चिततेतही साकारलेल्या सिंगापूर-मलेशिया सहलीत गार्डन्स बाय द बेतील फ्लॉवर डोम, जगातील सर्वात मोठे काचेचे ग्रीनहाऊस आणि निसर्गाचे अप्रतिम वैभव अविस्मरणीय ठरले.
Gardens by the Bay Singapore

Gardens by the Bay Singapore

esakal

Updated on

चारू दवंडे

सिंगापूरमध्ये आम्ही फ्लॉवर डोम बघायला गार्डन बाय द बे या ठिकाणी गेलो. येथे असंख्य रंगांची, विविध प्रजातींची, विविध हवामानात वाढणारी फुलझाडे अत्यंत आकर्षक स्वरूपात मांडलेली आहेत. निसर्गाचे हे रंगीबेरंगी मोहक रूप बघून आम्ही भारावून गेलो. हे जगातील सर्वात मोठे काचेचे ग्रीनहाऊस आहे.

माझा शिक्कारहित पासपोर्ट शिक्क्यासाठी आतुर होता. पण म्हणतात ना, प्रवासाचा योग यावा लागतो...  दरवेळी मी काहीतरी ठरवायचे, पण काहीतरी अडचण यायचीच. यावर्षीच्या मे महिन्यामध्ये फिरायला जाण्याचे ठरवले, पण युद्धाचे वारे वाहू लागले. तेव्हा मला पु. ल. देशपांडे यांच्या अपूर्वाई पुस्तकातील एक किस्सा आठवला. पुलंनी प्रवासाची तयारी सुरू केली त्यावेळी नेमकी मध्यपूर्वेत युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. माझ्याही बाबतीत तसेच काहीसे झाले. पण यावेळी बहुतेक प्रवासाचा योग असावा. त्यामुळे  माझी मलेशिया आणि सिंगापूरची सहल आनंदात पार पडली.

सुरुवातीला नक्की कुठे जायचे हे ठरत नव्हते. युरोपात जावे असे ठरत असतानाच आमच्या परिचितांपैकी दोघा-तिघांचे युरोप  दौरे  युद्धाच्या वातावरणामुळे  होऊ शकले नव्हते असे कळले. त्यामुळे आशिया खंडातच कुठेतरी जावे, असा विचार करून आम्ही एका टूर ऑर्गनायझर कंपनीमध्ये गेलो. तिथे आम्हाला आमच्या बजेटनुसार अनेक पर्याय व त्या संदर्भातली माहिती सविस्तरपणे मिळाली. त्यामुळे मलेशिया व सिंगापूर ही ट्रीप करायचे ठरले. फायनली माझे परदेश प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com