Premium|Skin Polishing : स्किन पॉलिशिंग म्हणजे नेमकं काय? त्वचा नितळ आणि ताजीतवानी करण्याची प्रक्रिया समजून घ्या

Skin Polishing vs Body Spa: Key Differences : स्किन पॉलिशिंगमुळे त्वचेवरील मृत पेशी दूर करून त्वचा नितळ, कोमल आणि ताजीतवानी दिसण्यास मदत होते; मात्र बॉडी स्पा आणि स्किन पॉलिशिंग या वेगळ्या प्रक्रिया आहेत.
Skin Polishing

Skin Polishing

esakal

Updated on: 

स्वप्ना साने

बाजारात अनेक ब्रँडच्या पॉलिशिंग किट्स उपलब्ध आहेत. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार ब्यूटी थेरपिस्ट प्रॉडक्ट्स वापरत असतात.

काही ठिकाणी तज्ज्ञ आयुर्वेदिक बॉडी पॉलिशिंग करून देतात.

त्यामध्ये वेगवेगळ्या आयुर्वेदिक पावडर आणि तेल यांचा वापर करून पॉलिशिंग केलं जातं. त्वचेला सूट होणारे प्रॉडक्ट्स वापरून डेड स्किन रिमूव्ह केली जाते.

पॉलिशिंग करणं म्हणजेच एखादी वस्तू किंवा जागा स्वच्छ, चकचकीत करून नव्यासारखं करण्याची प्रक्रिया. आपण त्वचेला पॉलिशिंग करतो, त्याला बॉडी अॅण्ड फेस पॉलिशिंग किंवा स्किन पॉलिशिंग म्हणतात. स्किन पॉलिशिंग प्रोसेस खूपच रिलॅक्सिंग आणि रिफ्रेशिंग असते. त्वचा सुंदर, नितळ, कोमल आणि स्वस्थ दिसावी हा यामागचा उद्देश असतो. तरुण, प्रौढ, महिला अथवा पुरुष कोणीही स्किन पॉलिशिंग करू शकतात. शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करून सर्वांग सुंदर करण्याची ही एक पद्धत आहे.

बऱ्याच जणांना वाटतं, की बॉडी स्पा आणि स्किन पॉलिशिंग एकच प्रकार आहे. परंतु, या दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत आणि दोन्ही करण्यामागची कारणंदेखील वेगवेगळी आहेत. बॉडी स्पा ही टोटल रिलॅक्सेशन देणारी प्रोसेस आहे. यामध्ये हेड टू टो कम्प्लीट मसाज असतो आणि त्याचेही बरेचसे प्रकार असतात. ते नंतर बघू.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com