Premium|Skyroot Vikram 1 : विक्रम-१ ची ऐतिहासिक झेप; स्कायरूटच्या यशाने भारताच्या खासगी अवकाश उद्योगाला नवे पंख

India Private Space Sector : स्कायरूटच्या विक्रम-१ रॉकेटच्या यशामुळे भारताच्या खासगी अवकाश क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. स्वस्त, विश्वासार्ह भारतीय कंपन्यांमुळे जागतिक अवकाश बाजारपेठेत भारताचे स्थान मजबूत होण्याची शक्यता आहे.
Skyroot Vikram 1

Skyroot Vikram 1

esakal

Updated on

मयुरेश  प्रभुणे

जागतिक बाजारपेठेत स्पेस एक्ससारख्या कंपन्यांशी स्पर्धा करणे हे इस्रोसारख्या सरकारी संशोधन संस्थेचे काम नाही. त्यासाठी तुलनेने स्वस्त आणि भरवशाचे भारतीय कंपन्यांचेच 'ब्रँड' तयार करावे लागतील. अमेरिकेतील अवकाश कंपन्यांची प्रगती पाहता, भारताने खासगी अवकाश कार्यक्रम सुरू करण्यात फार उशीर केलेला नाही. स्कायरूटला मिळालेल्या यशामुळे अवकाश बाजारपेठेत येत्या दशकात भारताचेही स्वतःचे स्थान असेल, याचा आत्मविश्वास देशाला नक्कीच मिळाला आहे.   

भारताच्या स्कायरूट  कंपनीच्या विक्रम १ या रॉकेटने पहिल्याच प्रयत्नात उपग्रहांना अपेक्षित कक्षेत प्रस्थापित करून १८ जुलैला इतिहास रचला. पहिल्याच  प्रयत्नात यशस्वीपणे उपग्रह प्रक्षेपित करणारी स्कायरूट ही जगातील पहिली कंपनी ठरली आणि खासगी अवकाश उड्डाणाची क्षमता असलेला भारत हा जगातील चौथा देश ठरला. या प्रक्षेपणाचे देशात सर्वत्र स्वागतच झाले. मात्र, खासगी क्षेत्राला चालना देऊन भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) कामावर मर्यादा आणायचा हा प्रयत्न आहे, असाही सूर काही जणांकडून उमटला.

भारतासाठी मात्र खासगी अवकाश प्रक्षेपणाचे महत्त्व अनेकार्थाने आहे. येत्या दशकात जगभरातील अवकाश कार्यक्रमांचा  मोठा वाटा खासगी  क्षेत्राकडे जाणार असताना भारत या स्पर्धात्मक बाजारपेठेत आपलेही स्थान निर्माण करू शकणार आहे. योग्य वेळेत मिळालेले हे यश देशांतर्गत नव्या क्षेत्राला चालना देणारे ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com