Premium|Smartphone and Time Management : काळ, वेळ आणि घड्याळ

Digital Distractions and the Value of Time : घड्याळ वेळ सांगायचे, पण स्मार्टफोनच्या सततच्या सूचना, संदेश आणि व्हिडिओंमुळे वेळेचे भान हरवते. सेकंद, मिनिट आणि तास काट्यांच्या संवादातून बदलत्या जीवनशैलीवर मिश्कील भाष्य केले आहे.
Digital Distractions and the Value of Time

Digital Distractions and the Value of Time

esakal

Updated on

डॉ. हेमंत बा. अय्या

पूर्वी वेळ पाहण्यासाठी घड्याळ बघावं लागायचं; आता वेळ पाहायला गेलं, की दहा सूचना, वीस संदेश, तीस व्हिडिओ आणि शंभर विचलनं समोर उभी ठाकतात. वेळ पाहण्याच्या निमित्तानं वेळच निसटून जाते. पूर्वी घड्याळ वेळ सांगायचं; आता स्मार्टफोन वेळ खाऊ लागलाय. दिवसाचे चोवीस तास तेवढेच आहेत, पण ‘वेळच मिळत नाही’ ही तक्रार मात्र आज सर्वाधिक ऐकू येते.

एकदा घड्याळात चांगलीच खडाजंगी उडाली. कारणही तसंच होतं. सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा; तिघेही आपापल्या श्रेष्ठत्वाचा दावा करत होते. ‘‘अरे, तुम्ही काय सुस्त मेले! माझ्यासारखं पटापट धावणं जमलंय का कधी तुम्हा दोघांना?’’ सेकंद काटा भराभर फिरतच फुशारकी मारू लागला. मिनिट काटा काही गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हता, ‘‘मी तरी तुझ्यासारखा नुसता गोलगोल फिरत नाही आणि तास काट्यासारखा एका आकड्यावर तासन्‌तास ध्यानस्थही बसत नाही. माझ्या एका फेऱ्याशिवाय घड्याळाला वेळच कळत नाही, समजलास?’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com