Smartphone shoot Esakal
साप्ताहिक
Smartphones : रिल्स किंवा छोटं शूटिंगसाठी करा या मोबाईल फोन्सची निवड; जाणून घ्या त्यांचे फीचर्स
रिल्स करणाऱ्यांमध्ये बव्हंशी हौशी तरुण मुलंमुली असतात. त्यामुळे साधारणतः त्यांचा कल १५ ते २० हजार रुपयांपर्यंत मिळेल अशा चांगल्या मोबाईलकडे असतो
ज्योती बागल
रिल्स तयार करणं हा सुरुवातीला अनेकांसाठी छंद असताे. मात्र त्यात जम बसल्यास अनेकजण त्याला व्यवसायिक रूप देतात. यामध्ये तरुणांचं प्रमाण जास्त आहे. मात्र सुरुवातीला मोबाईल किंवा ॲक्सेसरीजवर जास्त पैसे खर्च करणं सर्वांना परवडतंच असं नाही. शिवाय रिल्स तयार करण्यासाठी कॅमेरा आणि प्रोसेसर या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे दोन्ही एकाच गॅजेटमध्ये उपलब्ध करून देणाऱ्या आणि रिल्स किंवा मिनी व्ह्लॉग शूटिंगसाठी उपयुक्त ठरतील अशा काही मोबाईल फोन्सची थोडक्यात माहिती...

