डॉ. सदानंद मोरे
भाषेच्या संदर्भातील विवेचन आपल्याला एका वेगळ्या प्रश्नाकडे घेऊन जाते. युरोप खंडामधील, विशेषतः आधुनिक काळातील जर्मन, फ्रेंच, इंग्लिश या भाषांमधील देवाणघेवाण व परस्परप्रभाव गृहीत धरूनही विशिष्ट भाषा आणि विशिष्ट विचारसरणी यांच्यात काही एक संबंध असावा का?
आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यासक आणि आपल्या अभ्यासाचे फलित प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वयाच्या शंभरीपर्यंत कार्यरत राहिलेला, विश्वाची पुनःस्थापना करण्यात ज्याचा महत्त्वाचा वाटा आहे तो म्हणजे अर्थातच हेन्री किसिंजर!
किसिंजरला जे इतिहासपुरुष महत्त्वाचे आदर्श वाटत असत व ज्यांचा त्याच्यावर प्रभाव होता त्यांच्यापैकी एक विन्स्टन चर्चिल. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचे नेतृत्व करणारा पंतप्रधान. महायुद्ध काळातील आणि नंतरही चर्चिलच्या राजकारणाचे एक महत्त्वाचे सूत्र म्हणजे इंग्लंड आणि अमेरिका यांच्यातील विशेष संबंध - Special Relationship. विशेष म्हणजे हे सूत्र स्वतः किसिंजरलाही मान्य होते.