

Stool Test Diagnosis
esakal
डॉ. योगेश शौचे
मल (स्टूल) परिक्षणावरून केले जाणारे रोगनिदान हे सुरुवातीच्या काहीशा ढोबळ अंदाजावरून आता खूप पुढे आले आहे. संसर्गाचे निदान, पोटातल्या जीवाणूंचा अभ्यास आणि मान्यताप्राप्त मल डीएनए कर्करोग चाचणीपर्यंत पोहोचलेला हा एक समृद्ध, सोपा निदान स्रोत ठरतो आहे. आधुनिक, बहुआयामी, कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित ही पद्धती, निदानातली अचूकता वाढविण्याची व अन्य रोगांसाठी चाचण्या उपलब्ध होण्याची शक्यता दर्शविते. परंतु, त्यासाठी कठोर मानकीकरण, पडताळणी आणि नैतिक गोपनीयतेचे पालन आवश्यक आहे.
मागच्या वर्षी एक काहीशी विचित्र बातमी झळकली होती. निमित्त होते अलास्कामध्ये १५ ऑगस्टला झालेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे प्रमुख पुतीन यांच्या भेटीचे. या भेटीसाठी आलेल्या पुतीन यांची विष्ठा त्यांच्या सुरक्षारक्षकांनी सुटकेसमध्ये भरून परत नेली, अशी बातमी होती. परदेशात कोणी त्यांच्या विष्ठेची तपासणी करून त्यांच्या आरोग्याविषयी माहिती मिळवू नये हे त्या मागचे कारण. ते सत्तेवर आल्यापासून असे करत आहेत. एवढेच नाही तर यापूर्वी स्टॅलिनच्या काळात यूएसएसआरने माओच्या प्रकृतीची माहिती अशीच मिळवण्याचा प्रयत्न केला होता. शीत युद्धाच्या काळात ब्रिटन व अमेरिका शत्रुपक्षांच्या नेत्यांच्या आरोग्याची माहिती, वापरलेल्या टॉयलेट टिशूमधून मिळवायचा प्रयत्न करायचे, असेही त्या बातमीत म्हटले होते.
तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल, पण खरेतर मानवी विष्ठा आज केवळ व्यक्तीच्या आरोग्याची माहिती देणारे महत्त्वाचे साधनच नाही, तर अनेक आजारांवर उपचार ठरणारी जादूची कांडी झाली आहे.