Premium|French fries origin story : नाव वेगवेगळे, पण चव एकच! जगाला वेड लावणाऱ्या ‘फ्रेंच फ्राइज’चा रंजक इतिहास

Global Evolution of Potato Dishes 2026 : नाव बदलले तरी चव तीच राखत जगभरातील फास्टफूड संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेल्या 'फ्रेंच फ्राइज'च्या उगमाचा रंजक इतिहास आणि फ्रान्स, बेल्जियममधील दाव्यांवर प्रकाश टाकणारा विशेष खाद्यसंस्कृती लेख.
Global Evolution of Potato Dishes 2026

Global Evolution of Potato Dishes 2026

esakal

Updated on

मृणाल तुळपुळे

फ्राइजना प्रत्येक देशात वेगळे वेगळे नाव आहे. इंग्रज त्यांना चिप्स, तर युरोपियन्स त्यांना फिंगर चिप्स म्हणतात. फ्रेंच लोक पॉम फ्रिट्झ तर बेल्जियम व हॉलंडमध्ये त्यांना फ्रिट्स वा पटट म्हटले जाते. अमेरिकेत त्यांना फ्रेंच फ्राइज, तर जर्मनीत त्याला पॉम्स म्हटले जाते. आपल्याकडे मात्र त्याची फ्रेंच फ्राइज किंवा फिंगर चिप्स ही नावे प्रचलित आहेत. प्रत्येक देशाने आपल्या पद्धतीने फ्राइज स्वीकारले आणि त्यांना स्थानिक संस्कृतीची चव दिली. विशेष म्हणजे नाव बदलले, तरी फ्राइजची युनिक चव मात्र सर्वत्र सारखीच असते!

गरमागरम, सोनेरी रंगाचे, कुरकुरीत असे ‘फ्रेंच फ्राइज’ हे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. बटाट्यासारख्या साध्यासुध्या कंदापासून तयार केलेला हा पदार्थ आज जगभरातील फास्टफूड संस्कृतीमधील अविभाज्य भाग झाला आहे. जागतिक खाद्यसंस्कृतीत बटाट्याला लोकप्रियता मिळवून देण्यात फ्राइजचा फार मोठा वाटा आहे. फ्राइज म्हणजे बटाट्याच्या लांबट कापांना तेलात तळून तयार केलेला खुसखुशीत पदार्थ. बाहेरून काहीसे कुरकुरीत आणि आतून मऊ असे फ्राइज म्हणजे सर्व वयाच्या व समाजातील सर्व स्तरातील लोकांचा एक आवडता पदार्थ आहे. अशा या फ्राइजनी बटाट्यापासून केलेला सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणून ओळख मिळवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com