रक्ताची शपथ खऱ्या अर्थाने पाळणारं; हिमोग्लोबिनोपॅथी व्यवस्थापन आणि नियंत्रण संशोधन केंद्र, महाराष्ट्र

भारतात १९५०च्या दरम्यान सिकलसेलचे अस्तित्व लक्षात आले. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश तसेच छत्तीसगड या राज्यांमधील मुख्यत्वे दुर्गम भागात सिकलसेलचे रुग्ण आढळून येतात.
hemoglobin laboratory research center
hemoglobin laboratory research centeresakal

सुधीर फाकटकर

रक्तातील लाल पेशींच्या आकारात बदल झाल्यामुळे होणारा एक आजार ‘सिकलसेल’ म्हणून ओळखला जातो. जनुकांमधील उत्परिवर्तनामुळे होणारा हा आजार अनेक व्याधी निर्माण करत रक्तक्षयापर्यंत जाऊन रुग्णाचे आयुष्यमान कमी करतो. जगात विसाव्या शतकाच्या आरंभी, तर भारतात १९५०च्या दरम्यान सिकलसेलचे अस्तित्व लक्षात आले. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश तसेच छत्तीसगड या राज्यांमधील मुख्यत्वे दुर्गम भागात सिकलसेलचे रुग्ण आढळून येतात.

सिकलसेल आजार संपूर्णपणे बरा करण्यासाठी उपचार विकसित झालेले नसले तरी आटोक्यात ठेवण्यासाठी विविध उपचार विकसित होत आहेत. याच अनुषंगाने सिकलसेल तसेच थॅलॅसेमिया, म्हणजे रक्तातील लाल पेशींच्या कमतरतेमुळे होणारा आजार, या मानवी रक्ताशी संबंधित विकारांवर संशोधन,

या विकारांचे नियंत्रण आणि उपचार तसेच माहितीचा प्रसार आणि या क्षेत्रासाठी मनुष्यबळ निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने २०१५मध्ये चंद्रपूर येथे ‘हिमोग्लोबिनोपॅथी व्यवस्थापन आणि नियंत्रण संशोधन केंद्र’ (Centre for Research, Management and Control of Haemoglobinopathies) स्थापन केले आहे.

hemoglobin laboratory research center
Sakal Podcast : इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला ते भाजप आमदार कोर्टावरच चिडले

हिमोग्लोबिनोपॅथीच्या, म्हणजे रक्तपेशीविषयक आजारांवरील चिकित्सेच्या अनुषंगाने या केंद्रात, रक्तविज्ञान, जैवरासायनिक, जैवसांख्यिकी, रेण्वीयशास्त्र, उपचारविज्ञान आणि समाजशास्त्र असे संशोधन विभाग आहेत. जैवरासायनिक विभागात रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन रक्ताच्या अनुषंगाने यकृत, मूत्रपिंडाचे कार्य आणि रक्तघटकांवर संशोधन केले जाते.

जैवसांख्यिकी विभागात रुग्णाच्या रक्त तपासण्यांद्वारे मिळालेल्या माहितीचे रेण्वीयशास्त्र, उपचारविज्ञानशाखा तसेच अन्य संशोधन कार्यांसाठी विश्‍लेषण केले जाते. उपचारविज्ञान विभागात सद्यःस्थितीतील रुग्ण तसेच संभाव्य रुग्णांचा अंदाज घेऊन उपचार केले जातात. यासाठी केंद्राने वैद्यकीय महाविद्यालये तसेच आरोग्यासाठी कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांनाही जोडून घेतले आहे.

hemoglobin laboratory research center
Nashik Sakal YIN : नाशिकमध्ये आजपासून केंद्रीय कॅबिनेटचे अधिवेशन; केंद्रीय कॅबिनेटचे पदाधिकारी राहणार उपस्थित

रक्तविज्ञान विभाग सिकलसेल तसेच अन्य रक्तविषयक आजारांसंदर्भात निदान-तपासणी-नियंत्रण आणि प्रतिबंधविषयक उपायांचा विकास करण्याबरोबरच प्रशिक्षण जागरूकता आणि समुपदेशन कार्यक्रम आखतो. जैवसांख्यिकी विभागात रुग्णांच्या रक्तविषयक माहितीबरोबरच उपचारप्रक्रिया आणि रेण्वीय पातळीवरील तपासण्यांची आकडेवारी ठेवली जाते. तसेच या विभागात संशोधनासंदर्भात विश्‍लेषणाच्या सुविधाही निर्माण करण्यात आल्या आहेत.

उपचारविज्ञान विभागात वैद्यकीय रुग्णालये-महाविद्यालये तसेच खास शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांसाठी निदान-तपासणी-उपचार साध्य करण्याबरोबरच उपचारविषयक प्रकल्पांचे आराखडे विकसित केले जातात. हे सर्व विभाग अद्ययावत प्रयोगशाळा तसेच वैद्यकीय उपकरणांनी समृद्ध आहेत. तर समाजशास्त्र विभाग इथले संशोधन रक्तविषयक आजार असलेले रुग्ण आणि संबंधित समूहांपर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या माध्यमातून कार्यरत असतो.

hemoglobin laboratory research center
SAKAL Exclusive: प्रायोगिक नाटकांवर महिला विषयांची छाप! नाट्य संस्थांकडून नवनवीन, हटके प्रयोग

अवघ्या काही वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या केंद्राने सिकलसेल आजारामुळे हानी पोहोचणारे अवयव, सिकलसेल मनुष्यसमूह, सिकलसेल आजाराबाबतच्या उपचार आणि त्रुटी तसेच गर्भवती महिलांचे आजार अशा अनेक विषयांवरील संशोधन साध्य केले आहे. तसेच सिकलसेल आजाराची तपासणी करणारा संच विकसित करण्यात आला आहे. या केंद्राने सिकलसेल आजारविषयक विकसित केलेला संपर्क माध्यमातील कार्यक्रम विशेष उल्लेखनीय ठरलेला आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत साध्या भाषेत सिकलसेल चित्रमय तक्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. धोरणात्मक उपक्रमांची आखणी करत या केंद्राने सिकलसेलबरोबरच थॅलॅसेमिया विकारावरील संशोधनही प्रगतिपथावर ठेवले आहे. वैद्यकीय तसेच जैवविज्ञानातील विद्यार्थ्यांसाठी इथे कार्यक्षेत्राच्या आणि विशेष प्रशिक्षण संशोधनाच्या संधी उपलब्ध असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com