Premium|Healthy Glowing Skin : उन्हाळ्यात त्वचा निरोगी आणि तजेलदार ठेवण्यासाठी प्रभावी उपाय

Essential Summer Skin Care Routine : उन्हाळ्यातील उष्णता, घाम आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचेच्या समस्या वाढतात. योग्य क्लिन्सिंग, हायड्रेशन आणि सनस्क्रीनचा नियमित वापर केल्यास त्वचा निरोगी, तजेलदार आणि सुरक्षित राहू शकते.
Healthy Glowing Skin

Healthy Glowing Skin

esakla

Updated on

गौरी परदेशी

प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य प्रॉडक्ट्स आणि रूटीन निवडणे आवश्यक आहे. नियमितता, स्वच्छता आणि संतुलित आहार यामुळेच त्वचेवर खरा ग्लो येतो. उन्हाळ्यात स्वतःची योग्यप्रकारे काळजी आणि चांगल्या सवयी अंगीकारल्यास त्वचा केवळ सुरक्षितच राहत नाही, तर नैसर्गिकरित्या सुंदर आणि तेजस्वी दिसते.

उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या वाढणे अगदी सामान्य आहे. वाढलेले तापमान, प्रखर सूर्यप्रकाश, घाम, धूळ आणि प्रदूषण यांचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे त्वचा निस्तेज, तेलकट किंवा कोरडी दिसू लागते. टॅनिंग, पिग्मेंटेशन, पिंपल्स, सनबर्न आणि डिहायड्रेशन या समस्या उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात, म्हणूनच उन्हाळ्यात त्वचेची योग्य आणि नियमित काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. योग्य सवयी अंगीकारल्यास आणि थोडी काळजी घेतल्यास या ऋतूमध्येही आपण आपली त्वचा निरोगी, तजेलदार आणि फ्रेश ठेऊ शकतो.

क्लिन्सिंग

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्वचा स्वच्छ ठेवणे. क्लिन्सिंग हा स्किन केअर रूटीनचा पाया आहे. उन्हाळ्यात घाम आणि धूळ त्वचेवर साचते, ज्यामुळे चेहऱ्यावरची पोअर्स ब्लॉक होतात आणि पिंपल्सची समस्या वाढते. दिवसातून किमान दोन वेळा आपल्या स्किन टाइपनुसार सौम्य फेसवॉशने चेहरा धुणे आवश्यक आहे. तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींनी जेल-बेस्ड किंवा फोमिंग फेसवॉश वापरावा, तर कोरड्या त्वचेसाठी क्रीम-बेस्ड किंवा हायड्रेटिंग फेसवॉश अधिक योग्य ठरतो. यामुळे त्वचा स्वच्छ राहते आणि अतिरिक्त तेल नियंत्रणात राहते.

हायड्रेशन

त्यानंतर महत्त्वाचे असते ते म्हणजे हायड्रेशन. उन्हाळ्यात घामावेटे शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडते, त्यामुळे त्वचा कोरडी, थकलेली आणि निस्तेज दिसू शकते. यासाठी दररोज किमान २.५ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नारळपाणी, लिंबूपाणी, ताक, फळांचे रस यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला आणि त्वचेला हायड्रेटेड ठेवतात. त्वचेच्या बाह्य हायड्रेशनसाठी हलके, वॉटर-बेस्ड मॉइश्‍चरायझर वापरावे. अनेकांना वाटते, की उन्हाळ्यात मॉइश्‍चरायझरची गरज नसते, पण हा एक मोठा गैरसमज आहे. प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेला हायड्रेशनची गरज असतेच, त्यामुळे योग्य मॉइश्‍चरायझर वापर करून त्वचा संतुलित ठेवता येते आणि स्किन बॅरिअरही मजबूत होण्यास मदत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com