

Summer Special Marathi Recipes
esakal
वाढप
२ ते ३ व्यक्तींसाठी
साहित्य
पाव कप वरी तांदूळ, १ कप दूध, पाव कप घट्ट आमरस, गरजेनुसार साखर, २ टीस्पून साजूक तूप.
कृती
वरी तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावेत. कढईत तूप गरम करून त्यात धुतलेले तांदूळ घालावेत व दोन ते तीन मिनिटे छान परतून घ्यावेत. त्यानंतर कपभर पाणी किंवा अर्धा कप पाणी व अर्धा कप दूध घालून झाकण ठेवून पाच मिनिटे तांदूळ शिजू द्यावेत. तांदूळ मऊ शिजल्यानंतर त्यात साखर व दूध घालून एक उकळी काढावी. नंतर आमरस घालून शिजवावे. वरून आंब्याचे तुकडे घालून गरम गरम खीर सर्व्ह करावी.