

Summer vacation DIY ideas for kids
esakal
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मुलांसाठी आनंद, मोकळा वेळ आणि नवीन काहीतरी शिकण्याची उत्तम संधी. आठ ते बारा वयोगटातील मुलांनी मोबाईल आणि टीव्हीपासून थोडावेळ दूर राहून उपक्रमांमध्ये सहभागी होणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असते. त्यासाठी घरबसल्या करता येण्याजोग्या काही ॲक्टिव्हिटिज...
वूडन स्टिक्स आर्ट
आईस्क्रीम स्टिक्स वापरून डीआयवाय पद्धतीने फोटो फ्रेम, पेन स्टँड अशा विविध वस्तू तयार करता येतात.
साहित्य : पंधरा ते तीस आइस्क्रीम स्टिक्स, डिंक किंवा ग्लू गन, अॅक्रेलिक रंग, ब्रश, स्टोन्स, बीड्स, रिबन,
५ बाय ५ इंचाची फोटो फ्रेम, ३ बाय ३ इंचाचे पेन स्टँड.
कृती : आइस्क्रीम स्टिक्स सरळ रेषेत अरेंज करून बेस तयार करा. या स्टिक्स डिंकाने एकावर एक लावून हवा तो आकार तयार करा व डिंक सुकण्यासाठी अर्धा ते पाऊण तासांचा वेळ द्या. डिंक पूर्ण सुकल्यानंतर शेप रंगवा व स्टोन्स, बीड्सने डेकोरेट करा. हे आर्ट तयार करण्यासाठी साधारण दीड ते दोन तास लागतात.
टीप - स्टिक्समध्ये गॅप ठेवू नका. ग्लू गन वापरताना मोठ्यांची मदत घ्या.
मुलांसाठी फायदे - सर्जनशीलता आणि संयम वाढतो. पारंपरिक कलेची ओळख होते. हाताची पकड आणि नियंत्रण
सुधारते. डिझाईन सेन्स विकसित होतो.