Premium|Surya Upasana and Vitamin D synthesis : सूर्य उपासनेचे महत्त्व; आरोग्य आणि अध्यात्माचा संगम

Sun worship significance in Indian culture : भारतीय संस्कृतीतील सूर्योपासनेचे महत्त्व आणि सूर्यकिरणांमधून मिळणाऱ्या व्हिटॅमिन डी सह मानवी आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांचे शास्त्रीय विवेचन या लेखात मांडले आहे.
Surya Upasana and Vitamin D synthesis

Surya Upasana and Vitamin D synthesis

esakal

Updated on

डॉ. कांचनगंगा गंधे/ अशोक कुमार सिंग

सूर्योदय आणि सूर्यास्त हे चक्र अनादि कालापासून अव्याहत सुरू आहे. सूर्य जरी अस्ताला गेला, तरी उद्याचा सूर्य नवीन ‘आभा’, नवीन ‘आशा’ घेऊनच उदयाला येईल, हा दृढ विश्वास आपल्या प्राचीन संशोधकांनी, ऋषिमुनींनी आपल्याला वेदांमधून सांगितला आहे.

साऱ्या सृष्टीचा कर्ता, करविता; सृष्टीला चेतना, ऊर्जा देणारा, चेतन-अचेतन गोष्टींना उजळवून टाकणारा, प्रकाशमान करणारा; सात रंगांच्या सात विविध घोड्यांच्या रथात बसून न थकता, लयीत भ्रमण करणारा; स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत सर्व ग्रहांना आपल्या कह्यात ठेवून त्यांच्यातही ‘भ्रमण’ लयबद्धता राखणारा, सृष्टीतल्या वनस्पतींमध्ये ऊर्जा घालून, त्यांच्या हरितद्रव्याला चेतना देऊन सजीव सृष्टीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे चिरंतन अन्न पुरवणारा; त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वाढवणारा, आरोग्य निकोप ठेवणारा पूर्व दिशेचा स्वर्ण-यज्ञ-सूर्य! या ताऱ्याची महती आपल्या ऋषींना ज्ञात झाल्यामुळे सूर्याला प्रमुख देव, विश्वातला सर्वाधिक तेजस्वी, ज्योतिर्धन म्हणून सर्वात उच्च स्थान आहे. अशा या अलौकिक सूर्याची पूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे.

आर्याणां देवता सूर्यो विश्वचक्षुर्जगत्पतिः।

कर्मणां प्रेरको देवः पूज्यो ध्येयश्च सर्वदा ॥

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com