आंबा स्पेशल : फूडपॉइंट
प्रिती सुगंधी
साहित्य
दह्यासाठी : दोन कप आंब्याचा रस, १ कप दही, मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून पिठीसाखर.
वड्यासाठी : एक कप ४ ते ५ तास भिजवून बारीक वाटलेली उडीद डाळ, तळण्यासाठी तेल, मीठ चवीनुसार, २ लिटर पाणी.
सर्व्हिंगसाठी : तीन टेबलस्पून खजूर चटणी, १ कप बारीक शेव, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि हे पाणी वडा भिजवण्यासाठी तयार ठेवावे. नंतर आंब्याचा रस, दही, मीठ आणि पिठीसाखर एकत्र करून मिक्सरमध्ये चांगले फेटावे. हे मिश्रण १५ मिनिटे बाजूला ठेवावे. वाटलेल्या उडीद डाळीत थोडे मीठ घालून चांगले फेटावे. हातावर पाणी लावून या मिश्रणाचे वडे करावेत आणि कढईत तेल गरम करून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळावेत. तळलेले वडे १० मिनिटे मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवावेत. सर्व्ह करताना वडे प्लेटमध्ये घ्यावेत. त्यावर आंबा-दह्याचे मिश्रण घालावे. वरून खजूर चटणी, बारीक शेव आणि चिरलेली कोथिंबीर घालून आंबा दहीवडा सर्व्ह करावा.
टीप : मी ही रेसिपी करण्यासाठी हापूस आंबा वापरते, त्यामुळे ही डिश गोडसर आणि स्वादिष्ट लागते. तुम्ही इतर कोणताही आंबा वापरू शकता, मात्र त्यानुसार चवीत थोडा फरक जाणवतो.