Premium|Ethical hacking careers : सायबर सुरक्षेतील एथिकल हॅकर्स: ब्लॅक हॅटपासून फरक, शिक्षण, सर्टिफिकेट कोर्सेस आणि करिअर मार्ग

Qualities Needed to Become a Successful Ethical Hacker : एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या मार्गांनी चालणारे तंत्रज्ञानाचे खेळ; बँक खाती सुरक्षित ठेवणारा 'एथिकल हॅकर' आणि लोकांची फसवणूक करणारा 'सायबर गुन्हेगार' यांच्यातील फरकावर प्रकाश टाकणारा विशेष माहितीपूर्ण लेख.
Qualities Needed to Become a Successful Ethical Hacker

Qualities Needed to Become a Successful Ethical Hacker

esakal

Updated on

ॲड. शालिनी दीपक शर्मा

यशस्वी एथिकल हॅकर होण्यासाठी केवळ कॉम्प्युटरचे प्राथमिक ज्ञान असणे पुरेसे नाही. यासाठी जिज्ञासा, संयम, विश्‍लेषणात्मक विचार, समस्या सोडविण्याची क्षमता, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रबळ नैतिक जबाबदारी असणे आवश्यक आहे. सायबर धोके सतत बदलत असल्यामुळे या क्षेत्रात सतत शिकत राहणे अत्यंत गरजेचे आहे.

मध्यरात्रीची वेळ होती. एकाच शहराच्या दोन कोपऱ्यांत दोन तरुण आपल्या लॅपटॉपमध्ये एकाग्रतेने कोड टाइप करत बसले होते. रोहन बहुराष्ट्रीय कंपनीच्या सायबर सुरक्षा विभागात कार्यरत होता. एका आघाडीच्या बँकेने आपली ऑनलाइन प्रणाली खरोखरच सुरक्षित आहे का, हे तपासण्यासाठी त्याच्या टीमला नेमले होते. तासन्‌तास तो त्या बँकिंग ॲप्लिकेशनमधील त्रुटी शोधत होता. ग्राहकांचे खाते, पासवर्ड आणि पेमेंट सिस्टीम हॅक होऊ शकते का, हे तो तपासत होता. त्याला सापडलेल्या प्रत्येक त्रुटीचे काळजीपूर्वक दस्तावेजीकरण करून त्याचा अहवाल दिला जात होता, जेणेकरून प्रत्यक्षात हल्ला होण्यापूर्वी ती त्रुटी दुरुस्त करता येईल.

तिथूनच अवघ्या काही किलोमीटर अंतरावर दुसऱ्या कोपऱ्यात आरव रोहनच्या अगदी उलट काम करत होता. आपल्या खोलीत एकटाच बसून लोकांना फसवून त्यांचे ओटीपी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी बनावट बँकिंग लिंक्स आणि फिशिंग संदेश तयार करत होता. काही मिनिटांतच कोणाची तरी आयुष्यभराची पुंजी नाहीशी होऊ शकत होती आणि तंत्रज्ञानावरील त्यांचा विश्‍वास उडू शकत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com