Premium|Tax Benefits : आपण कर का भरतो?

Tax Money : कर म्हणजे सरकारकडे जाणारा पैसा; मात्र त्यातून रस्ते, शाळा, रुग्णालये, पाणी, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या सुविधा समाजाला मिळतात. त्यामुळे कराचा खरा परतावा समजून घेणे महत्त्वाचे आहे.
Tax Benefits

Tax Benefits

esakal

Updated on

डॉ. अमेय खरे

कर हा आपल्या खिशातून सरकारकडे जाणारा पैसा आहे. पण त्याचा प्रवास तिथं संपत नाही. रस्ता, शाळा, रुग्णालय, बस, पाणी, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या रूपानं आपण भरलेला कर आपल्या आयुष्यात परत येत असतो. म्हणूनच कराचा खरा अर्थ ‘आपण किती दिलं?’ यात नसतो, तो ‘त्या पैशातून समाजाला काय मिळालं?’ यात असतो.

महिन्याच्या शेवटी पगार खात्यात जमा होतो. त्यानंतर घरभाडं, वीज बिल, किराणा, मुलांचं शिक्षण, प्रवास, कर्जाचा हप्ता अशा अनेक गोष्टींसाठी पैसे बाजूला काढले जातात. काही रक्कम बचतीसाठी ठेवली जाते. मग पगाराच्या स्लिपमध्ये किंवा व्यवहारांच्या नोंदींमध्ये आणखी एक गोष्ट दिसू लागते, ती म्हणजे ‘कर’. आपण कधी त्याकडे फारसं लक्ष देत नाही. कधी कर जास्त वाटतो; तर कधी मनात प्रश्नही येतो, ‘मी माझ्या कमाईतून कर तर भरतोय, पण त्याचा मला परतावा नेमका कुठं मिळतो?’ हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे.

आपण एखादी वस्तू विकत घेतो, तेव्हा तिची किंमत आपल्याला दिसते. रेस्टॉरंटमध्ये जेवलो तर बिल मिळतं, रिक्षानं प्रवास केला तर भाडं देतो. पण कराच्या बाबतीत व्यवहार वेगळा असतो. आपण पैसे देतो, पण त्या बदल्यात एखादी एकच वस्तू किंवा सेवा आपल्या हातात येत नाही. मग कराचा उपयोग नेमका कशासाठी होतो?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com