उदय पेंडसे
योगासने करण्याचेही एक तंत्र आहे, त्यानुसार शरीराची गरज लक्षात घेऊन ठरावीक पद्धतीने आणि शिस्तबद्ध योगासने केली पाहिजेत. ‘आसन’ ही केवळ शरीराची नव्हे, तर मनाच्या एकाग्रतेची स्थिती आहे.
एकविसाव्या शतकातील माणूस विसाव्या शतकातील माणसाच्या तुलनेत अधिक ‘अस्थिर’ झाला आहे. १९४०-५०च्या सुमारास जन्मलेले लोक त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगताना खात्रीने म्हणतील, की त्याकाळात सगळ्यांकडे सगळ्यांसाठी आणि स्वतःसाठी वेळ होता... आज मात्र आपल्याकडे इतरांसाठी सोडा, स्वतःसाठीसुद्धा वेळ नाही.