Premium|Urban Terrace Gardening Guide : शहरात गच्चीवर ‘ग्रीन कॉर्नर’; सेंद्रिय टेरेस गार्डनिंग, किचन गार्डन आणि शहरी शेतीचा हिरवा प्रवास

Sustainable Urban Farming India : शहरी सिमेंटच्या जंगलात स्वतःचा 'ग्रीन कॉर्नर' कसा उभारावा, गच्चीवरील बागेचे नियोजन, सेंद्रिय पद्धती आणि पावसाळ्यातील निसर्गचक्र यांचा मेळ घालत शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन करणारे विशेष सदर आजपासून आपण सुरू करत आहोत.
Sustainable Urban Farming India

Sustainable Urban Farming India

esakal

Updated on

डॉ. तृप्ती करेकट्टी / डॉ. दिलीप माळी

पुढील काही लेखांमधून आपण शहरामध्ये गच्चीवर आपला ‘ग्रीन कॉर्नर’ कसा निर्माण करता येईल, याची माहिती घेणार आहोत. गच्चीवरील पाण्याचा योग्य निचरा, छताची घ्यायची काळजी, सेंद्रिय-नैसर्गिक पद्धती या दोहोंमधील फरक यांपासून ते कुंड्यांची निवड, कम्पोस्टिंग, कोणत्या सीझनमध्ये कोणत्या भाज्या लावाव्यात; फळझाडे, औषधी वनस्पती, कंदमुळे, हायड्रोपोनिक्स आणि व्हर्टिकल गार्डनसारखे नवीन पर्याय या आणि इतर अनेक संबंधित गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत.

‘वृक्षा ये नव पालवी, सृष्टीचे चैतन्य मोहरले’ - माझ्या आजीच्या कवितेतील ही कोवळ्या पोपटी रंगाची ओळ, मॉन्सूनपूर्व पाऊस झाल्यावर आता इथे-तिथे सर्वत्र प्रत्यक्ष साकार होऊ लागली आहे. मनभावन वर्षाऋतूचे स्वागत करण्यासाठी नव-प्रस्फुटीत कोमल पल्लवांची तोरणे बांधून वृक्षवल्ली सजल्या आहेत. गावाकडे शेतांमध्ये कामाची लगबग सुरू आहे. पावसाला सुरुवात व्हायच्या आत राने तयार व्हायला हवीत. नांगरून ठेवलेल्या रानांतून कुळव फिरताहेत. कुठे शेणखत घालून जमिनीला सुपीक करण्यासाठी खुराक देणे सुरू आहे, तर कुठे सरी पाडणे सुरू आहे. बगळे कुळवाच्या आगेमागे किडे पकडायला तुरुतुरु धावत आहेत. भुसभुशीत केलेल्या काळ्याशार मातीच्या सरींमध्ये उभ्या शुभ्र बगळ्यांची नक्षी लक्ष वेधून घेत आहे. नवीन रसरशीत सृष्टी तयार करण्यासाठी धरा जशी पावसाची आतुरतेने वाट पाहती आहे, तशीच काहीशी अवस्था पशुपक्षी आणि माणसाच्या मनाचीही आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com