Premium|Terrace Vegetable Gardening : गच्चीवर वांगी, टोमॅटोसह फळभाज्यांची लागवड; भरघोस उत्पादनासाठी सोप्या टिप्स

Growing Vegetables in Pots : गच्चीवरील भाजीपाला बागेत वांगी, टोमॅटो, भेंडी, मिरचीसारख्या फळभाज्यांची टप्प्याटप्प्याने लागवड, योग्य कुंडी, आधार आणि निगा राखल्यास वर्षभर ताजा भाजीपाला सहज मिळू शकतो.
Growing Vegetables in Pots

Growing Vegetables in Pots

esakal

Updated on

डॉ. तृप्ती करेकट्टी / डॉ. दिलीप माळी

फळभाज्या असोत, की वेलवर्गीय भाज्या, गच्चीवर लावताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे, एकाच प्रकारच्या भाजीची एकदम अनेक रोपे कधीच लावायची नाहीत. गच्चीवर टप्याटप्प्याने भाजी लावावी. गरजेप्रमाणे सात ते आठ रोपे एकदाच लावायची आणि त्यानंतर दर २०-२५ दिवसांनी परत नवीन रोपे किंवा बिया लावत राहायच्या.

मागच्या लेखात (वेलवर्गीय फळभाज्या, ता. २० जून) आपण वेलवर्गीय भाज्यांच्या लागवडीची माहिती घेतली. आजच्या लेखात आपण गच्चीवर सहज येणाऱ्या फळभाज्या म्हणजेच वांगी, भेंडी, मिरची, टोमॅटो, कोबी, फुलकोबी यांविषयी जाणून घेऊ या.

वांगी

कृष्णाकाठची लांब व टोकदार वांगी हा वांग्यांमधील सर्वात लोकप्रिय प्रकार. याशिवाय हिरवी आणि जांभळी संकरित वांगी, भरताची वांगी, लांबट निमुळती वांगी अशा वांग्यांच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. याशिवाय जंगली झाडावर कलम केलेली व अनेक वर्षे जगू शकणारी रोपेही मिळतात. या झाडावर रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. या झाडाची उंची चार ते पाच फूट असते. त्यामुळे मोठ्या आकाराची कुंडी वापरावी लागते. इतर जातींची रोपे मात्र १२ ते १५ इंच खोल कुंडीत लावावीत. रोप लावल्यानंतर वांगी उगवायला दोन-सव्वा दोन महिने लागतात. विशिष्ट जात आणि हवामान यांवर हा कालावधी अवलंबून असतो. गच्चीवर दोन ते तीन जातींची चार ते पाच रोपे लावली तरी खूप होते. एका कुंडीमध्ये दोन रोपांची लागवड करावी.

टोमॅटो

लहान कुंडीत किंवा ग्रो-बॅगमध्ये टोमॅटो लावता येतो. याच्याही धनश्री, रूपाली, कुल, सिझेन्टा अभिनव, वैशाली, चेरी टोमॅटो अशा अनेक जातींच्या बिया बाजारात उपलब्ध असतात. या बियांपासून रोपे उगवून किंवा नर्सरीतून सात ते आठ रोपे आणून लावलीत, तरी कुटुंबापुरते पुरेसे होते. टोमॅटोच्या रोपांना काठीने आधार द्यावा लागतो किंवा मंडप करून दोरीने फांद्या वर बांधाव्या लागतात. हे अगदी न विसरता करावे.

भेंडी

भेंडीची लागवड बियांपासून केली जाते. भेंडी खोल कुंडीत किंवा ड्रममध्ये लावल्यास चांगले उत्पादन मिळते. एका कुंडीत चार ते सहा बिया लावाव्यात. रोपे उगवल्यानंतर १५ दिवसांनी चार सशक्त रोपे ठेवून इतर रोपांची विरळणी करावी. दीड-पावणे दोन महिन्यांत भेंड्या लागण्यास सुरुवात होते. चांगली माती व हवामान असेल, तर हे झाड पाच फूट उंच वाढते. भेंड्या दोन ते तीन इंच लांब झाल्या, की भाजीसाठी काढाव्यात. भेंडी काढताना देठावरील लव हाताला टोचू नये याची काळजी घ्यावी. झाडाला सतत भेंड्या लागत राहण्यासाठी दर दोन ते तीन दिवसांनी भेंडीची खुडणी करावी. आपल्या घरापुरती गच्चीवर दहा ते बारा रोपे लावली तरी भरपूर होतात. भेंडीच्या पुसा सावनी, पुसा मखमली, कोकण भेंडी या काही लोकप्रिय जाती आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com