Premium|Terrace Water Garden : गच्चीवरील बागेत छोटासा जलाशय तयार करा; कमळ, कुमुदिनीने वाढवा बागेची शोभा आणि जैवविविधता

Terrace Water Garden : घरच्या गच्चीवर किंवा अंगणात छोटा जलाशय तयार करून कमळ, कुमुदिनी आणि तरंगणाऱ्या जलवनस्पती लावता येतात. यामुळे बागेची शोभा, आर्द्रता आणि जैवविविधता वाढण्यास मदत होते.
Terrace Water Garden

Terrace Water Garden

esakal

Updated on

डॉ. तृप्ती करेकट्टी / डॉ. दिलीप माळी

जलवनस्पतींना भारतीय परंपरेत विशेष स्थान आहे. जलवनस्पती केवळ सौंदर्यवर्धनासाठीच नव्हे, तर पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठीही महत्त्वाच्या ठरतात. त्यांच्यामुळे टेरेस गार्डनची शोभा वाढते. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे पक्ष्यांसाठी पाण्याची सोय होते व बागेतील जैवविविधता वाढते.

गच्चीवर असो की अंगणात, छोटेसे कारंजे, कृत्रिम धबधबा, तलाव मन मोहून घेतोच. एखाद्या जलाशयात कमळ, कुमुदिनी (वॉटर लिली), पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पती लावल्या, तर बागेचे सौंदर्य कैकपटीने वाढते. कमळाची गोल व मोठी पानेही फार मनमोहक दिसतात. या जलाशयाभोवती रंगीबेरंगी आणि सुगंधी फुलझाडे व वनस्पती लावता येतात. असा जलाशय केवळ सौंदर्यवर्धक घटक न राहता, पर्यावरणपूरक आणि बागेस उपयुक्त ठरतो. पाण्यामुळे वातावरणातील आर्द्रता वाढते, उन्हाळ्यात उष्णता कमी प्रमाणात जाणवते आणि झाडांची वाढ चांगली होते. तसेच जलस्रोतांमुळे पक्षी, फुलपाखरे आणि मधमाशा यांसारखे परागीकरण करणारे कीटक आकर्षित होतात आणि बागेतील जैवविविधता वाढीस लागते. असे बहुउपयोगी जलाशय घरच्या घरीच कसे निर्माण करावेत, त्यांची देखभाल कशी करावी आणि यात कोणत्या पाणवनस्पती लावाव्यात हे पाहू या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com