

Sant Namdev Punjab Stay
esakal
नेईन पंढरी - डॉ. रवींद्र शोभणे
महाराष्ट्रात संत नामदेवांच्या कार्याचा आणि काव्याचा विचार करता त्यांना त्यांचे श्रेय देण्यात आपण काटकसर केली, हा इथल्या जातिव्यवस्थेचा परिणाम होता हेही समजून घ्यावे लागते. म्हणूनच नामदेव किंकर होतात, दरोडेखोर होतात आणि त्यापुढील म्हणजे ‘ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस’ अशी सुभाषितवजा रचना करून त्यांना पायरीचा चिरा ठेवण्यातच आपण धन्यता मानली. याचा अर्थ संतपरंपरेनेच त्यांचे श्रेय त्यांना देण्यापासून दूर सारले. असे का व्हावे, हा महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे.
संत नामदेवांच्या पंजाब प्रांतातल्या वास्तव्यासंबंधी आपण काही मुद्द्यांचा विचार केला होता. त्यानुसार संत नामदेव पंजाबात कोणत्या मार्गाने गेले, कधी गेले, त्यांची ती तीर्थावळीची कितवी यात्रा होती, याबद्दल विचार केला होता. त्याच मुद्द्यांचा पुन्हा नव्याने विचार करून त्यांचा मुक्काम पंजाबात किती वर्षे होता आणि तेथील त्यांच्या कार्याची पावती इतर संतांनी त्यांना कशी दिली याबाबत काही विचार करणे महत्त्वाचे वाटते.