

तब्बल १७ वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत भारताने पहिलावहिला टी-२० विश्वकरंडक जिंकला, तेव्हा रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख नाव होते. आता तो सलग नववी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा खेळणार आहे. कदाचित ही त्याची शेवटची टी-२० विश्वकरंडक स्पर्धा असू शकते