Premium|Zoonotic spillover vs lab leak theory : ‘कोविड’ आला कुठून?

Covid-19 fake news and misinformation : कोविड उत्पत्तीबाबतचे षड्‌यंत्र सिद्धांत आणि त्या काळातील अफवांचे विश्लेषण या लेखात केले आहे. चीनची प्रयोगशाळा, राजकीय हेतूने पसरवलेली खोटी माहिती आणि शास्त्रीय तथ्यांची मोडतोड यावर लेखकाने परखड प्रकाश टाकून सत्यता पडताळली आहे.
Zoonotic spillover vs lab leak theory

Zoonotic spillover vs lab leak theory

esakal

Updated on

रवि आमले

आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी म्हटले आहे, की अजूनही झूनोटिक स्पिलओव्हर, प्रयोगशाळेतून गळती इत्यादी सर्व शक्यता गृहीत धरावयास हव्यात. अमेरिकी सरकारच्या ‘नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन’च्या संकेतस्थळावरही कोविडचा विषाणू प्राण्यांतून माणसात आल्याचे म्हटले आहे. पण तेथेही अधिक चौकशी व्हायला हवी असे म्हटलेले आहे. असे म्हणण्याचे कारण, चीनकडून माहिती पुरवण्यात होत असलेली टाळाटाळ...

कोरोना काळ आठवतोय? साधारणतः २०१९च्या नोव्हेंबर-डिसेंबरपासून प्रामुख्याने इंग्रजी वृत्तपत्रांतून, काही वृत्तवाहिन्यांतून चीनमधील कोविडच्या प्रकोपाच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. जागतिक पातळीवर हळूहळू तो चर्चेचा विषय झाला होता. पण आपण निवांत होतो.

सन २०२०चा जानेवारी-फेब्रुवारी उजाडला. आपण जरा सावरलो. आता मराठी दैनिकांनी त्या साथीची चाहूल घ्यायला सुरुवात केली होती. सरकारी पातळीवरून ‘अभ्यास’ सुरू झाला होता. तज्ज्ञ मंडळींमध्ये काळजीचे वातावरण होते. ३ फेब्रुवारीपर्यंत केरळमध्ये कोविडचे तीन रुग्ण आढळले होते. ही साथ परदेशातून येते, त्यावर निर्बंध घालायला हवेत, अशा सूचना केल्या जात होत्या. पण ते अरण्यरुदन ठरत होते. दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू होते, आणि देशाचे लक्ष अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘नमस्ते’ करण्याकडे लागले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com