Premium|Earth crust evolution : पृथ्वीच्या पोटातील हालचालींमुळे दिवसाची लांबी बदलणार? गाभा आणि प्रावरणातील 'या' छुप्या बदलांचे धक्कादायक वास्तव!

Geophysics and plate tectonics : पृथ्वीचे कवच हे केवळ एक स्थिर आवरण नसून ते अंतरंगातील हालचालींचे गतिशील केंद्र आहे. नवीन संशोधनानुसार, पृथ्वीचे सर्व स्तर एकमेकांशी जोडलेले असून, गाभा आणि प्रावरणातील बदलांचा परिणाम थेट भूपृष्ठावर आणि चुंबकीय क्षेत्रावर होत आहे.
Geophysics and plate tectonics

Geophysics and plate tectonics

esakal

Updated on

डॉ. श्रीकांत गबाले, डॉ. श्रीकांत कार्लेकर

पृथ्वीवर राहणाऱ्या सजीवांच्या दृष्टीने पृथ्वीचे कवच हा सगळ्यात महत्त्वाचा थर आहे. या थराच्या उत्क्रांतीचा इतिहासही विलक्षण आहे. आपण पाहतो ते पृथ्वीचे सगळे सौंदर्य ज्या पृष्ठभागावर एकवटले आहे, तो भाग म्हणजे पृथ्वीचे कवच. अतीव सुंदर डोंगरदऱ्या, पर्वतशिखरे, नदी, नाले, समुद्र, वृक्षवेली आणि जंगले यांनी समृद्ध असे प्रचंड पृथ्वीवरचे दुधावरच्या साईइतके पातळ, पण तितकेच भक्कम आवरण म्हणजेच पृथ्वीचे कवच! हे कवच पृथ्वीच्या अंतरंगातील लहान-मोठ्या सर्व हालचालींचे पृष्ठभागावर दृश्य आविष्कार दाखविणारे संवेदनशील आणि महत्त्वाचे ठिकाण आहे.

पृथ्वीचे कवच (Crust), प्रावरण (Mantle) आणि गाभा (Core) हे तीनही स्तर वेगळे आणि स्थिर आहेत, असा पृथ्वीच्या रचनेसंबंधी जुना दृष्टिकोन होता. नवीन संशोधनानंतर या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल होत आहेत. पृथ्वी ही एक जटिल आणि सक्रिय प्रणाली आहे, हे नवीन अभ्यासांतून सूचित होत आहे. नवीन अभ्यासानुसार सर्व स्तर परस्पर जोडलेले आणि गतिशील आहेत. थरांत उष्णता, प्राकृतिक घटक आणि रासायनिक घटक यात सतत देवाणघेवाण होत असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com