Premium|Nutrition and TB Prevention : टीबीच्या लढाईत 'पोषण' सर्वात मोठे शस्त्र; नव्या लस संशोधनातून धक्कादायक वास्तव समोर

VPM1002 and Immuvac TB Vaccine Results : टीबीवरील नवीन लस संशोधनात 'पोषण' हा घटक कळीचा ठरत असून, दक्षिण आफ्रिकेतील एड्स परिषदेत उपस्थित झालेल्या 'औषध आणि आजार' यांच्यातील विषमतेचा प्रश्न आजही भारतासारख्या विकसनशील देशांपुढे गंभीर आव्हान म्हणून उभा आहे.
Nutrition and TB Prevention

Nutrition and TB Prevention

esakal

Updated on

टीबीवरील व्हीपीएम १००२ आणि इम्युवॅक या दोन्ही लशी ज्या मुलांचे आणि प्रौढांचे पोषण चांगले आहे आणि बॉडी मास इंडेक्स १८पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींमध्ये अधिक परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे योग्य पोषण हा मुद्दा यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या लशींसंदर्भातील संशोधन आशादायक आहे हे नक्की. तथापि, याबाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी या संशोधनाकडे अधिक तपशिलात आणि बारकाईने पाहण्याची गरज आहे.

या घटकाला अनेक सामाजिक-आर्थिक आयाम आहेत, हे आपण जाणतोच.

गोष्ट आहे २००० सालातील. डर्बन या दक्षिण आफ्रिकेतील देशात आंतरराष्ट्रीय एड्स परिषद भरली होती आणि या परिषदेत बोलताना युगांडा देशातील संशोधक आणि फिजिशियन पीटर मुग्येन्यी यांनी एक वाक्य उच्चारले आणि सारेजण स्तब्ध झाले. ते म्हणाले, ‘‘औषधं कुठं आहेत? जिथं आजार नाही तिथं औषधं आहेत, आणि आजार कुठं आहे? जिथं औषधं नाहीत तिथं आजार आहे.’’ ते हे बोलत होते एड्स आजारावरील ॲँटिरेट्रोव्हायरल औषधांबाबत. या आजाराचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या आफ्रिकेत ही महागडी औषधे मिळणे जवळपास दुरापास्त होते. अगदी रास्त शब्दांत त्यांनी आपली ही खंत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडली होती. आजही एड्सच काय, पण इतर अनेक आजारांच्या बाबतीत तिसऱ्या जगातील देशांची अवस्था फारशी वेगळी नाही. टीबीही त्यात आलाच. क्षयरोग म्हणजेच टीबी किंवा एड्ससारख्या आजारांवरील महागड्या उपचारांसाठी अनेकदा भारतासारख्या देशाला आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते, ही नकोशी वाटणारी पण कठोर वस्तुस्थिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com