
डॉ. सुरेश सावंत
घरभर दरवळणारा सुगंध या पुस्तकातील गोष्टी जशा शहरात घडतात, तशाच खेड्यात आणि जंगलातही घडतात. ह्या कथांतील पात्रे जशी शहरी भाषेत बोलतात, तशीच खेड्यापाड्यांतील त्यांच्या बोलीभाषेतही बोलतात. परिस्थितीची आणि जबाबदारीची जाणीव असणारे कथांतील बालकुमार फारच लोभसवाणे आहेत.
घरभर दरवळणारा सुगंध हा एकनाथ आव्हाड यांचा बालकथासंग्रह सकाळ प्रकाशनाने नुकताच अतिशय आकर्षक स्वरूपात प्रकाशित केला आहे. ह्या संग्रहात आशय आणि विषयाच्या दृष्टीने समृद्ध बारा कथा आहेत.