
श्रद्धा चमके
व्हिएतनामच्या प्रवासामधले गोल्डन हँड ब्रीज हे सर्वात सुंदर प्रेक्षणीय स्थळ होते. या पुलावर पोहोचलो तेव्हा पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती.
दोन हातांच्या तळव्यांच्या आकाराच्या आधाराने हा सोनेरी रंगाचा पूल तोलून धरला आहे. त्या हातांना ‘हॅंड्स ऑफ गॉड’ असे म्हटले जाते. हा पूल अतिशय देखणा आहे.
व्हिएतनाम हा निसर्गसौंदर्याने नटलेला देश आहे. तेथे पाहण्यासारखे, शोधण्यासारखे बरेच काही आहे हे तेथे गेल्यावर लक्षात आले. या देशाला भेट देण्यापूर्वी व्हिएतनाम-अमेरिका युद्धाविषयी ऐकले होते.
तब्बल २० वर्षे चाललेल्या या युद्धात लहानग्या व्हिएतनामने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला कसे नमवले याविषयी बरेच ऐकायला-वाचायला मिळते. या युद्धाविषयीच्या अनेक बाबी जाणून घेण्याविषयी, ती ठिकाणे बघण्याविषयी मनात कुतूहल होते.