Premium|Ravana Ki Khai Ellora Cave 14 : भक्ती-शक्तीचा पाषाणी उत्सव

Indian rock cut architecture Ellora : वेरूळच्या हिंदू लेण्यांमधील पाषाणी वैभव भारतीय शिल्पकलेचा अद्‍भुत अध्याय उलगडते. रावण की खाई, दशावतार आणि रामेश्वर लेण्यांतील कोरीवकाम भक्ती, शक्ती आणि मानवी भावनांचा उत्कट आविष्कार असून ते जागतिक वारशाचा अनमोल ठेवा मानले जातो.
Ravana Ki Khai Ellora Cave 14

Ravana Ki Khai Ellora Cave 14

esakal

Updated on

अमोघ वैद्य

वेरूळच्या लेण्यांमधून फिरताना आपण भक्ती आणि शक्तीचा जो पाषाणी उत्सव पाहतो, तो एका महान अध्यायाची पूर्वतयारी असल्यासारखा वाटतो. राकट खडकाला शब्दातीत सौंदर्य देणाऱ्या या शिल्पवैभवानंतर, आपली पावलं आपोआपच अशा दिशेला वळतात, जिथं मानवी कल्पनाशक्तीचा अंत होतो आणि साक्षात चमत्काराची सुरुवात होते!

वेरूळच्या डोंगररांगेतली बौद्ध लेण्यांची शांतता आणि जैन लेण्यांमधली सुबकता अनुभवल्यानंतर, आता आपण अशा एका टप्प्यावर आलो आहोत, जिथं पाषाणातून जणू ऊर्जेची कारंजी फुटली आहेत. वेरूळमधल्या हिंदू लेणी (क्रमांक १३ ते २९) म्हणजे भारतीय शिल्पकलेचा एक असा अध्याय आहे, जिथं दगड केवळ बोलत नाही, तर तो थिरकतो, गर्जना करतो आणि अद्‍भुत पौराणिक कथा जिवंत करतो!

आपण या लेणीसमूहाच्या मध्यभागाकडे वळल्यावर जाणवतं, की इथल्या शिल्पकारांनी केवळ देवालयं कोरली नाहीत, तर त्यांनी भारतीय संस्कृतीतल्या शक्ती, भक्ती आणि वैभवाचा एक महान उत्सवच पाषाणात साजरा केला आहे. कैलास लेणं हा या समूहाचा केंद्रबिंदू असला, तरी त्याव्यतिरिक्त इतर लेणी, मग ते दशावतार असो, रामेश्‍वर असो वा धुमारस, ही लेणी आपल्याला एका वेगळ्याच दैवी विश्‍वात घेऊन जातात. इथं कुठं शिव तांडव करत आहेत, कुठं विष्णू अवतारांच्या रूपानं दुष्टांचा संहार करत आहेत, तर कुठं सप्तमातृकांचं वात्सल्य पाषाणातून पाझरत आहे. राकट बेसॉल्ट खडकावर उमटलेली ही देव-देवतांची रूपं पाहून प्राचीन भारताच्या समृद्ध परंपरेची आणि अफाट कल्पनाशक्तीची प्रचिती येते. या भागात आपण कैलास सोडून वेरूळच्या इतर हिंदू लेण्यांमधल्या अशा अफाट शिल्पवैभवाचा वेध घेणार आहोत, ज्यांनी या डोंगररांगेला शिल्पकाशीचं रूप दिलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com