

Vitthal Mauli Sant Sahitya Analysis
esakal
संत साहित्यात किंवा संतांच्या आराधनेत त्यांनी विठ्ठलाला माउलीची उपमा दिली आहे. विठुमाउली अशी साद विठ्ठलभक्त विठ्ठलाची विनवणी करताना घालतात. इतर कोणत्याही पंथात अशी माउलीसदृश हाक आपल्या दैवताला उपासक घालत नाही. त्यामुळे या उपासनेला मातृसंवेदनेची किनार प्राप्त होते.
संत नामदेवांच्या अभंगगाथेत (शासकीय प्रत) पंढरपूरच्या विठ्ठलाचे अठ्ठावीस युगे विटेवरी उभे असण्यासंबंधी चार अभंग आहेत. (आणखीही काही अभंग असू शकतील किंवा ते अन्य संतांच्या रचनेतसुद्धा असू शकतात. इथे नामदेवांच्या रचनेतून हा विचार करावयाचा असल्यामुळे या अभंगांचा विचार समोर ठेवला आहे.) ते अभंग तपासून पाहणे इष्ट ठरेल -