Premium|Potato as a Survival Crop During Famine : दुष्काळात जीव वाचवणारा, जगभरच्या संस्कृतीत रुजलेला बटाटा; साध्या कंदापासून ‘खजिना’ होण्यापर्यंतचा प्रवास

How Potatoes Influenced Global Food Culture : दुष्काळात कोट्यवधींचे प्राण वाचवणारा बटाटा केवळ एक कंद नसून शेक्सपिअर, जोनाथन स्विफ्ट आणि पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यात मानवी भावविश्व, गरिबी अन् आकर्षणाचे प्रतीक बनलेला एक सांस्कृतिक खजिना आहे.
How Potatoes Influenced Global Food Culture

How Potatoes Influenced Global Food Culture

esakal

Updated on

स्नेहल बाकरे

अनेक देशांमध्ये बटाटा हा दुष्काळाच्या काळात लोकांना जगवणारा मुख्य अन्नस्रोत ठरला. त्यामुळे लोकांचं त्याच्याशी एक भावनिक नातंदेखील जोडलेलं आहे. आणि म्हणूनच बटाटा हे केवळ एक साधं कंद नसून, तो प्रत्येक देशाच्या हवामानानुसार, चवीनुसार आणि खाद्यसंस्कृतीनुसार बदलणारा एक खजिनाच आहे.

बटाटा... हा एक असा जादुई पदार्थ आहे ना, ज्यानं जेवण आणि जीवन सगळीकडेच आपलं अधिराज्य गाजवलं आहे. हा असा एकमेव पदार्थ आहे, ज्याला जगभरातल्या खाद्यसंस्कृतींत महत्त्वाचं स्थान आहे. तो विविध देशांच्या संस्कृती, साहित्य, कला, मनोरंजन तसंच अर्थव्यवस्थेपासून ते माणसांच्या भावविश्‍वातही खोलवर रुजलेला आहे. पु.ल. देशपांडे यांना मध्यमवर्गीय माणसांच्या जीवनातल्या गमतीजमती उलगडून सांगताना ‘बटाट्याची चाळ’ अर्थात बटाटा या लोभस पदार्थाची उपमा वापरायचा मोह आवरता आला नाही. तसेच विल्यम शेक्सपिअर यांनी द मेरी वाइव्ह्ज ऑफ विंडसर, ट्रॉयलस आणि क्रेसिडा या नाटकांमध्ये नुकत्याच युरोपमध्ये शिरलेल्या बटाट्याचा संबंध प्रेम, आकर्षण आणि चैन यांच्याशी जोडला; तर अँग्लो आयरिश लेखक जोनाथन स्विफ्ट आणि आयरिश कवी सीसम हीनी यांच्या लेखनातून बटाटा हा ग्रामीण जीवन, गरिबी, भूक आणि संघर्षमय जीवनाचं प्रतीक झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com