Premium|Narcissism: नार्सिसिझम म्हणजे काय.? तुम्ही तुमच्या मुलांबाबत अतिसुरक्षित वातावरण निर्माण करता, वाचा रिसर्च काय सांगतो..

When Self-Love Turns to Social Isolation : ग्रीक पुराणकथेतील नार्सिससच्या कहाणीतून टोकाच्या 'नार्सिसिझम'चे (स्वतःच्या प्रेमात बुडून जाणे) स्वरूप डॉ. बाळ फोंडके यांच्या लेखणीतून उलगडले आहे..
Narcissism

Narcissism

Esakal

Updated on

डॉ. बाळ फोंडके

टोकाच्या नार्सिसिझमचा फटका त्या व्यक्तीला तर बसतोच, पण ती व्यक्ती एखाद्या बेटासारखी इतरांपासून अलग पडलेली नसते, ती समाजातच वास करून असते. तिच्याही नकळत तिच्याशी संबंध येणाऱ्या समाजातील इतर व्यक्तींवरही तिच्या वागणुकीचा भलाबुरा, बहुतांशी बुराच, परिणाम होतोच. त्यापायीच मग सोशोबायोलॉजी या उभरत्या विज्ञानशाखेकडे वैज्ञानिक अधिक लक्ष देत आहेत.

कथा आहे ग्रीक पुराणातली. नार्सिसस नावाचा एक अतिशय देखणा आणि रुबाबदार तरुण जंगलातून हिंडत होता. एको नावाच्या एका अप्सरेच्या दृष्टीला तो पडला. ती त्याच्या प्रेमातच पडली. मात्र एकोला एक शाप होता. ती केवळ दुसऱ्यांकडून ऐकलेले शब्दच उच्चारू शकत होती. स्वतःच्या मनातले विचार त्यामुळं ती व्यक्त करू शकत नव्हती. तरीही नार्सिसस तिच्या भावना ओळखेल, आपल्या प्रेमाला प्रतिसाद देईल या अपेक्षेनं ती नार्सिससच्या जवळ गेली. पण त्यानं तिला नकारच दिला आणि तोही तिचा अपमान करत. तिचा काहीच दोष नसताना तिला अशी दूषणं दिल्यामुळं तिच्यावर मेहेरनजर असणाऱ्या देवांना राग आला. त्यांनी नार्सिससला शिक्षा करण्याचं ठरवलं. नार्सिससला इतर कोणाच्याही प्रेमात पडता येणार नाही. तो फक्त स्वतःच्याच प्रेमात आकंठ बुडून जाईल, असा शाप त्यांनी दिला.

तिथल्याच एका ओढ्याच्या पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसताच नार्सिसस त्याच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहतच राहिला. त्या प्रतिबिंबापासून स्वतःला दूर करण्याची शुद्धच त्याला राहिली नाही. ‘सांग दर्पणा कसा मी दिसतो’, असा सवालच त्या पाण्यातल्या छबीला तो करत राहिला. तिच्याच प्रेमात पडला. तो तहान-भूकही विसरून गेला. याची परिणती व्हायची तीच झाली. तो झिजत गेला आणि त्यानं जगाचा निरोप घेतला. तो बसला होता त्याठिकाणी एक नाजूक फूल उगवलं. ते आता त्याच्या नावानं ‘नार्सिसस’ म्हणून ओळखलं जातं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com