Premium|Ellora Jain Caves History : चिन्मय शांततेचा पाषाणप्रवास

Indian Rock-cut Architecture : वेरूळच्या डोंगररांगेतील उत्तर टोकाला विसावलेला जैन लेणी समूह म्हणजे भारतीय शिल्पकलेचा उत्कर्ष बिंदू असून, 'छोटा कैलास' ते 'इंद्रसभा' असा हा प्रवास पाषाणातील सूक्ष्म नक्षीकामाने पर्यटकांना थक्क करणारा आहे.
Ellora Jain Caves History

Ellora Jain Caves History

esakal

Updated on

अमोघ वैद्य

उत्तरेकडच्या कोपऱ्यातल्या एका लहान लेण्यात जैन शिल्पकलेतली सर्वात देखणी प्रतिमा आढळते, ती म्हणजे ‘सिद्धायिका’. या देवीचं सौंदर्य शिल्पकारानं एखाद्या काव्यासारखं कोरलं आहे. तिची कपाळावरची महिरप, धनुष्याकृती भुवया, शंखाकृती गळा आणि निमुळत्या मांड्यांची रचना पाहून ही एखादी सामान्य स्त्री नसून एक दिव्य देवता असल्याची खात्री पटते.

वेरूळच्या पाषाणप्रवासात बौद्ध लेण्यांच्या शांततेनंतर आता आपण एका अशा टप्प्यावर आलो आहोत, जिथं दगड अधिक कोमल, अधिक नाजूक आणि अधिक सूक्ष्म झाला आहे. डोंगररांगेच्या उत्तर टोकाला विसावलेला जैन लेण्यांचा हा समूह म्हणजे भारतीय शिल्पकलेच्या उत्कर्षाचा जणू एक मखमली अध्याय आहे.

आपण या लेण्यांच्या परिसरात पाऊल ठेवतो, तेव्हा इथल्या शांततेत एक वेगळंच तेज जाणवतं. जैन लेणी आपल्याला एका वेगळ्याच विश्‍वात घेऊन जातात. हे विश्‍व आहे, अत्यंत कडक तपश्चर्या आणि त्यातून लाभलेल्या अथांग आंतरिक शांतीचं! इथल्या बेसॉल्ट खडकावर केलेली नक्षी पाहून आश्चर्य वाटतं, मानवी हातांनी दगडांवर इतकं सुबक आणि तलम काम कसं केलं असेल? जणू पाषाणावर कापडाची वीण असावी, इतकी ही शिल्पं देखणी आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com