

Tipsy Pudding Recipe
esakal
सैन्यात एक रिवाज असतो. एखादा अधिकारी नव्या जागी बदली होऊन जातो तेव्हा ‘ऑफिसर्स मेस’मध्ये जेवण घेण्यासाठी त्याचे ‘डायनिंग इन’ व्हावे लागते. म्हणजेच त्याला आता अधिकृतरित्या मेसमध्ये केव्हाही जेवण करण्याची परवानगी असते.
बदली ज्या ठिकाणी होते, तीच त्या अधिकाऱ्याची कर्मभूमी असते. त्याच युनिटमध्ये पुढची किमान दोन वर्षे तो राहणार असतो. त्यामुळे त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची जेवणाच्या निमित्ताने आपल्या वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी व्यवस्थित ओळख व्हावी हा या डायनिंग इनचा मुख्य उद्देश असतो.