निकिता कातकाडे
शरीर निरोगी राहण्यासाठी योग्य आणि सकस आहार जितका आवश्यक असतो, तितकाच नियमित व्यायामही गरजेचा असतो. व्यायामाचे प्रकार अनेक असले, तरी अाठ आसनांचा समावेश असलेला सूर्यनमस्कार आरोग्यासाठी अधिक उपयुक्त मानला जातो.
सूर्यनमस्कारांचा सराव शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी ठरतो, असे तज्ज्ञ सांगतात. सूर्यनमस्कारांचा खरा फायदा घेण्यासाठी ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी घालणे आवश्यक आहे. या लेखात आपण सूर्यनमस्कारातील स्थिती कोणत्या, त्या कशा कराव्यात आणि त्यांचे आरोग्यसाठी फायदे काय आहेत हे जाणून घेणार आहोत.