

Petrodollar vs Petroyuan
esakal
भूषण महाजन
डॉइश बँकेच्या एका अहवालानुसार, इराणबरोबर सुरू असलेले अमेरिका व इस्राईलचे युद्ध अधिक गंभीर वळण घेऊ शकते, ज्यामुळे पेट्रोडॉलर प्रणालीपासून दूर जाऊन ‘पेट्रोयुआन’ सुरू होऊ शकते. म्हणजेच तेलाचा व्यापार वाढत्या प्रमाणात चिनी युआनमध्ये होऊ शकेल.
अजूनही इराण, इस्राईल व अमेरिका युद्धाची बातमी मागील पानांवर गेलेली नाही. ट्रम्प आलटून पालटून युद्ध जिंकल्याच्या घोषणा करीत असले, तरी आता उर्वरित जग त्याला फारशी किंमत देत नाही, कारण इराणची राजवट आम्ही बदलली आता इराण शरण कधी येतो ते पाहायचे असून, आम्ही त्यांना पुन्हा आठ दिवसांची मुदत देत आहोत, होर्मुझची सामुद्रधुनी मी मुक्त केल्याशिवाय थांबणार नाही, पण ती मुक्त केलीच पाहिजे असा आमचा उद्देश नाही, अशा अनेक कोलांट्या उड्या त्यांनी मारल्या. अगदी ताजी धमकी म्हणजे, आम्ही इराणला चिरडून टाकू, ही आहे. दुसऱ्या बाजूला ‘जिंकू किंवा मरू’ असा निर्धार घेऊन इराण लढत आहे. एका कड्याच्या टोकावर आज इराण उभा आहे. खाली पडलो, तर नष्ट होऊ ही भीती आहे. विजय मिळविणे अशक्यप्राय असले, तरी गनिमीकावा करून शत्रूला नामोहरम करणे शक्य आहे. एका शायरच्या शब्दांत सांगायचे तर -