
विद्या कुलकर्णी
एका फोटोग्राफरला नेमका क्षण टिपता येणं महत्त्वाचंच आहे. मला त्या क्षणाच्या शोधाची प्रक्रिया आणि तो दिसण्यापर्यंतचा प्रवास हा फोटोग्राफीतला सर्वात आनंददायी भाग वाटतो.
पत्रकारितेनं घडवलेली फोटोग्राफीची समज माझ्यासाठी महत्त्वाची आहे. आजही ती माझ्या कामाचा भाग आहे. आजचे माझे काम ‘डॉक्युमेंटरी फोटोग्राफी’ या प्रकारात मोडणारे आहे. यात फोटोचा सच्चेपणा वा वास्तव टिपणं छायाचित्र-पत्रकारितेसारखंच महत्त्वाचं आहे. फोटो रचलेले नसावेत, जे घडतंय त्याचं प्रामाणिक दर्शन देणारे असावेत हे दोन्ही प्रकारांतील साम्य आहे.